वैजापुरातील डॉक्टरची गोळी झाडून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:33 AM2018-01-06T00:33:57+5:302018-01-06T00:34:20+5:30

वैजापूर शहरामधील एका खाजगी रुग्णालयातील ३० वर्षीय अविवाहित डॉक्टरने घरातच स्वत:वर गावठी पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. फुलेवाडी रस्त्यावरील शिक्षक कॉलनीत हा प्रकार घडला. संजयकुमार ऊर्फ यश विनोद टेंभरे (रा. गोंदिया, ह.मु. वैजापूर), असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Suicide by lying a doctor of Vaijuapura | वैजापुरातील डॉक्टरची गोळी झाडून आत्महत्या

वैजापुरातील डॉक्टरची गोळी झाडून आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देखळबळ : घरात एकटेच असताना संपविली जीवनयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : वैजापूर शहरामधील एका खाजगी रुग्णालयातील ३० वर्षीय अविवाहित डॉक्टरने घरातच स्वत:वर गावठी पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. फुलेवाडी रस्त्यावरील शिक्षक कॉलनीत हा प्रकार घडला. संजयकुमार ऊर्फ यश विनोद टेंभरे (रा. गोंदिया, ह.मु. वैजापूर), असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वैजापूर शहरातील आनंद हॉस्पिटलमध्ये गेल्या चार वर्षांपासून बालरोगतज्ज्ञ या पदावर डॉ. संजयकुमार टेंभरे कार्यरत होते. आनंद हॉस्पिटलसमोरील शिक्षक कॉलनीत दुसºया मजल्यावर ते भाड्याच्या खोलीत एकटेच राहतात. शुक्रवारी त्यांनी दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्णालयात ड्यूटी करून निवासस्थान गाठले. दुपारी १ ते २ वाजेदरम्यान त्यांनी स्वत:कडील गावठी पिस्तुलातून डाव्या हाताने हृदयावर एक गोळी झाडून घेतली.
दरम्यान, रुग्णालय व्यवस्थापनाने दुपारी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी डॉ. टेंभरे यांना बोलाविण्यासाठी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉ. टेंभरे यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्णालयाचा सुरक्षारक्षक त्यांना बोलाविण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचला. त्यावेळी निवासस्थानाचा दरवाजा आतून बंद होता. आवाज देऊनही आतून दरवाजा उघडला जात नसल्यामुळे सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने ही बाब रुग्णालय व्यवस्थापनाला कळविली. त्यानंतर निवासस्थानाचा दरवाजा तोडल्यानंतर पलंगावर डॉ. संजयकुमार रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. गोळी झाडल्याचा आवाज येऊ नये म्हणून त्यांनी टी.व्ही.चा आवाज मोठा केला होता. या प्रकाराची माहिती पोलिसांना कळवताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, सहायक पोलीस निरीक्षक रामहरी जाधव, सहायक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग बहुरे, संजय घुगे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डॉक्टरकडे पिस्तूल कसे ?
४आत्महत्या केलेल्या डॉक्टरकडे पिस्तूल व चार ते पाच काडतुसे बघून पोलीसही चक्रावले आहेत. डॉ. संजयकुमार हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पिस्तूल कसे आले, या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करीत आहेत.
प्रेम प्रकरणातून आत्महत्या?
४दवाखान्यातील काही कर्मचारी
व परिसरातील नागरिकांच्या
मते डॉक्टर अविवाहित असून, त्यांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली असावी.

Web Title: Suicide by lying a doctor of Vaijuapura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.