‘पप्पा मला माफ करा’ म्हणत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:04 AM2021-07-04T04:04:16+5:302021-07-04T04:04:16+5:30

शिवाजीनगर भागात राहणारे शिक्षक काकासाहेब जाधव पत्नीसमवेत शनिवारी सायंकाळनंतर बाहेर गेले होते. काही वेळाने ते घरी आले असता त्यांची ...

Suicide by strangling a young woman saying ‘Daddy forgive me’ | ‘पप्पा मला माफ करा’ म्हणत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

‘पप्पा मला माफ करा’ म्हणत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

शिवाजीनगर भागात राहणारे शिक्षक काकासाहेब जाधव पत्नीसमवेत शनिवारी सायंकाळनंतर बाहेर गेले होते. काही वेळाने ते घरी आले असता त्यांची मुलगी अंजली ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. कुटुंबात आरडाओरड सुरू झाल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. तत्का‌ळ पाचोड पोलीस ठाण्यात फोनवरून माहिती दिली. सपोनि गणेश सुरवसे व पोलीस जमादार सुधाकर मोहिते घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह खाली उतरवून पाचोड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्या ठिकाणी चिठ्ठी असल्याचे आढळून आले. त्यात अंजलीने माझ्या मरणासाठी कोणालाही दोष देऊ नका, पप्पा मला माफ करा, असे लिहिलेले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आत्महत्येचे ठोस कारण समजू शकले नाही. पाचोड ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पुढील तपास गणेश सुरवसे करीत आहेत.

---

अंजली होती भावी शिक्षिका

वीस वर्षीय अंजली जाधव ही पैठण शहरातील महाविद्यालयात एका डीएडचे शिक्षण घेत होती. शिक्षणात एकदम हुशार असलेल्या अंजलीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले असेल, अशी चर्चा कुटुंबीयांसह नातेवाईकांमध्ये सुरू होती.

---

फोटो

Web Title: Suicide by strangling a young woman saying ‘Daddy forgive me’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.