बजाजनगरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:04 AM2020-12-31T04:04:51+5:302020-12-31T04:04:51+5:30
वाळूज महानगर : पती सतत चारित्र्यावर संशय घेऊन त्रास देत असल्याने २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...
वाळूज महानगर : पती सतत चारित्र्यावर संशय घेऊन त्रास देत असल्याने २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२९) रात्री बजाजनगरात घडली. सना बुऱ्हाणोद्दीन शेख, असे विवाहितेचे नाव आहे.
सनाच्या चारित्र्यावर जावई बुऱ्हाणोद्दीन हा संशय घेऊन पैशासाठी छळ करीत असल्याने तिने आत्महत्या केल्याची तक्रार सनाचे वडील सिकंदर नदाफ यांनी दिली. याप्रकरणी बुऱ्हाणोद्दीन दस्तीगर शेख (३१, रा. बजाजनगर) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक प्रीती फड तपास करीत आहेत.
सना सिकंदर नदाफ (रा.मुगळी, ता.अक्कलकोट, जि.सोलापूर) यांचे लग्न ७ जुलै २०१९ रोजी कर्नाटकातील बुऱ्हाणोद्दीन दस्तगीर शेख (रा.लक्ष्मी टेम्पल जबगा, ता.जि.गुलबर्गा) याच्या सोबत झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी पती-पत्नी बजाजनगरात राहण्यासाठी आले. काही दिवस चांगले नांदविल्यानंतर बुऱ्हाणोद्दीनने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. माहेरहून पैसे आण, अशी मागणी करू लागला. त्यामुळे माहेरच्या मंडळींनी बजाजनगरात येऊन जावयाची समजूत काढत घरखर्चासाठी ६ हजार रुपये दिले होते. २५ डिसेंबर रोजी सना यांनी वडिलांना मोबाइलवर संपर्क साधून तुम्ही खर्चासाठी पैसे देत नसल्याने पती सतत मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे सांगितले होते.
--------------------