आत्महत्या अडकल्या निकषात

By Admin | Published: May 28, 2014 12:39 AM2014-05-28T00:39:32+5:302014-05-28T00:42:24+5:30

शिवराज बिचेवार , नांदेड नांदेड जिल्ह्यात जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या काळात एकूण ३१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत़

Suicide stuck in queue | आत्महत्या अडकल्या निकषात

आत्महत्या अडकल्या निकषात

googlenewsNext

 शिवराज बिचेवार , नांदेड नांदेड जिल्ह्यात जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या काळात एकूण ३१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत़ परंतू शासनाच्या आत्महत्याग्रस्तांच्या बाबतीत असलेल्या जाचक नियमांमुळे केवळ १३ शेतकर्‍यांच्या आत्महत्या अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत़ फेब्रुवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ६६ हजार २९९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले़ त्यानंतर फेब्रुवारी ते एप्रिल या ३ महिन्यात जिल्ह्यातील २२ शेतकर्‍यांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपविले़ शासनाच्या आकडेवारीनुसार जानेवारी-५, फेब्रुवारी - ५, मार्च-१२, एप्रिल-५, मे-४ अशा एकूण ३१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत़ त्यात अनुदानासाठी फक्त १३ शेतकर्‍यांच्या आत्महत्या पात्र ठरल्या असून ९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत़ तर चौकशीसाठी ९ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत़ पात्र ठरलेल्या १३ शेतकर्‍यांच्या कुटुंंबियांना १० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे़ आत्महत्येच्या संदर्भात मदतीसाठी शासनाच्या असलेल्या जाचक नियमामुळे पीडित कुटुंबे अक्षरक्ष मेटाकुटीला येत आहेत़ कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने अगोदरच दुखात असलेल्या त्यांच्या आप्तांना शासकीय मदतीसाठीही कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात़ त्यासाठी कागदपत्रांची जुळवणी करताना त्यांची आर्थिक पिळवणुकही करण्यात येत असल्याची उदारहणे समोर येत आहेत़ प्रत्यक्षात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून मदत मिळाली नाही़ असे असताना कर्ता पुरुष गेलेल्या कुटुंबियांना तरी, मदतीचा आधार देवून सांत्वन करण्याची गरज आहे़ याकडे प्रशासन तसेच समाजसेवी संघटनांनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे़ एखाद्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्यानंतर मदतीसाठी निश्चित केलेले निकष पूर्ण करताना नातेवाईकांच्या मात्र नाकीनऊ येतात़ बँकेकडून थकित कर्जाचे प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते़ लोहा तालुक्यातील गोलेगाव येथील ४२ वर्षीय संतुका कामाजी गारुळे या शेतकर्‍यांनी १३ मार्च रोजी आत्महत्या केली होती़ ५ एकर मध्ये गहू, हरभरा आवला होता़ बियानांसाठी बँकेचे ९० हजारांचे कर्जही काढले होते़ गारुळे यांच्या आत्महत्येनंतर शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही़ त्यामुळे रोजमजुरी करुन उदरनिर्वाह करावा लागत असल्याची प्रतिक्रिया रेखाबाई गारुळे यांनी दिली़

Web Title: Suicide stuck in queue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.