विवाहाला दोन दिवस शिल्लक असताना वधूपित्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 06:27 PM2018-11-16T18:27:55+5:302018-11-16T18:28:39+5:30

मुलीच्या विवाहाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना ब्रीजवाडी येथील एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Suicide by taking a ransom of bridegroom while remaining two days of marriage | विवाहाला दोन दिवस शिल्लक असताना वधूपित्याची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहाला दोन दिवस शिल्लक असताना वधूपित्याची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

औरंगाबाद : मुलीच्या विवाहाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना ब्रीजवाडी येथील एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नागेश काशीनाथ आठवले (४०), असे आत्महत्या केलेल्या वधूपित्याचे नाव आहे.  

नागेश हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. बुधवारी रात्री घरी कोणी नसताना त्यांनी छताच्या अँगलला साडी बांधून गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांचा भाऊ संजय आणि अन्य नातेवाईकांनी त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल केले.  त्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोहेकॉ. विठ्ठल राठोड हे या घटनेचा तपास करीत आहेत. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. नागेश यांच्या थोरल्या मुलीचे लग्न १८ नोव्हेंबर रोजी असल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंबीय त्यासाठीच्या तयारीला लागले होते. दुसरीकडे लग्नासाठी आवश्यक असलेला पैसा जवळ नसल्याने नागेश यांची चिंता वाढली होती. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता त्यांचे नातेवाईक आणि पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Suicide by taking a ransom of bridegroom while remaining two days of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.