औरंगाबादमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Published: September 9, 2016 10:33 PM2016-09-09T22:33:40+5:302016-09-09T22:33:40+5:30
मुकुंदवाडी परिसरातील एन-२ सिडकोमधील न्यू एस.टी. कॉलनी येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ९ - मुकुंदवाडी परिसरातील एन-२ सिडकोमधील न्यू एस.टी. कॉलनी येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
स्वप्नील शशिकांत साखरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, स्वप्नील हा मूळचा तांदूळवाडी (ता. धारूर, जि. बीड) येथील रहिवासी होता. तो शिक्षणासाठी न्यू एस.टी. कॉलनी येथे राहणा-या चुलत्याकडे राहत होता. तो बारावीमध्ये शिकत होता. सकाळी तो नेहमीप्र्रमाणे कोचिंग क्लासेसला जाऊन आला.
त्यानंतर तो वरच्या मजल्यावरील अभ्यासासाठी असलेल्या खोलीमध्ये गेला. तेथे त्याने खोली आतून बंद केली आणि पंख्याला दोरीने बांधून गळफास घेतला. सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास त्याचे चुलते हे त्यास बोलावण्यासाठी त्याच्या खोलीत गेले असता त्यांना हा प्रकार दिसला. त्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी स्वप्नीलचे प्रेत घाटीत दाखल केले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.