शिवना येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:04 AM2021-02-18T04:04:41+5:302021-02-18T04:04:41+5:30
योगेश गवांडे या शेतकऱ्याला यंदा खरीप पिकांत अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतीसाठी घेतलेले खासगी तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे, ...
योगेश गवांडे या शेतकऱ्याला यंदा खरीप पिकांत अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतीसाठी घेतलेले खासगी तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. रब्बी पिकामधूनही काही हाती येण्याची शक्यता मावळल्याने ते नैराश्येत गेले होते. पत्नी माहेरी गेली असता, मंगळवारी रात्री त्यांनी घरात गळफास घेतला. याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पो.नि. गिरीधर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सिरसकर तपास करीत आहे.
चिमुकल्यांचे छत्र हरवले
योगेश गवांडे हे घरातील कर्तापुरुष होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ आणि तीन छोट्या मुली आहेत. योगेश यांच्या जाण्याने कुटुंब हवालदिल झाले असून, तीन छोट्या मुलींचा सांभाळ कसा करावा, असा प्रश्न त्यांच्या पत्नीसमोर उभा ठाकला आहे.
फोटो :
170221\img-20210217-wa0330_1.jpg
शिवना येथील मयत शेतकरी गवांडे