प्रेयसीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या; तरुणी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 08:23 PM2021-02-10T20:23:24+5:302021-02-10T20:23:24+5:30

मानसिक त्रास देऊन आर्थिक लुबाडणूक करीत असल्याने त्रस्त झालेल्या पैठण शहरातील २४ वर्षीय तरूणाने बुधवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Suicide of a young man fed up with his girlfriend's blackmailing; The young woman was arrested | प्रेयसीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या; तरुणी अटकेत

प्रेयसीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या; तरुणी अटकेत

googlenewsNext

पैठण : प्रेयसी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याच्या धमक्या देत सातत्याने मानसिक त्रास देऊन आर्थिक लुबाडणूक करीत असल्याने त्रस्त झालेल्या पैठण शहरातील २४ वर्षीय तरूणाने बुधवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित प्रेयसीवर गुन्हा दाखल करून तीला अटक केली आहे. कृष्णा पुंजाराम खुटेकर  रा. नारळा पैठण असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. 

आज सकाळी कृष्णा खुटेकर या तरूणाने खीशात चिठ्ठी लिहून राहत्या घरात केबल वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस पंचनामा करताना मयत कृष्णाच्या खीशात लिहलेली चिठ्ठी सापडली या चिठ्ठीत  मयत कृष्णा याने प्रेयसीचे नाव टाकून ती मला खुप त्रास देत आहे.मला काही काही धमक्या देत आहे , मी खुप मानसिक तणावात जावुन हे पाऊल उचलत आहे. तरी, माझी काहीच चुक नाही. मला न्याय देण्यात यावा असे लिहून ईंग्रजीत सही केलेली आहे.
या प्रकरणी मयत कृष्णाच्या आईने संबंधित प्रेयसी मुलास नेहमी पैसे मागत होती व त्रास देत असल्याचे सांगितले. या प्रकरणी मयत कृष्णाच्या काका शिवाजी भाऊराव इंगळे वय ४५ वर्ष व्यवसाय मजुरी रा.नारळा पैठण यांनी कृष्णाच्या प्रेयसी विरोधात पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रेयसीला अटक केली आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख बामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे हे करत आहेत.

Web Title: Suicide of a young man fed up with his girlfriend's blackmailing; The young woman was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.