आई-बाबांची 'सुकन्या' देईल समृद्धी; पोस्टाच्या योजनेला लॉकडाऊन काळात प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 01:31 PM2022-02-24T13:31:40+5:302022-02-24T13:35:02+5:30

टपाल खात्याने कात टाकली : काटकसरीतून संचयाचा मार्ग

'Sukanya' of parents will give prosperity; Sukanya Samrudhi plan of Post office preferred during lockdown | आई-बाबांची 'सुकन्या' देईल समृद्धी; पोस्टाच्या योजनेला लॉकडाऊन काळात प्राधान्य

आई-बाबांची 'सुकन्या' देईल समृद्धी; पोस्टाच्या योजनेला लॉकडाऊन काळात प्राधान्य

googlenewsNext

- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद :
भारतीय डाक विभागाने अलीकडच्या काळात कात टाकून अनेकविध आकर्षक उपक्रम समोर आणले आहेत. यात लॉकडाऊनच्या काळात पालकांनी पाल्यांसाठी सुकन्या समृद्धी योजनेला प्राधान्य दिले आहे.

सन २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत ६१३६ कुटुंबांनी पाल्यांच्या नावाने समृद्धी योजनेत बचत करण्यावर भर दिला आहे. मुलांसाठी काहीतरी संचय असावा, शिक्षण तसेच विवाह या सर्वांत मोठ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पालकांनी पार पाडण्यासाठी अगदी २५० रुपयांत खाते उघडून मुलीसाठी विश्वासाने सुकन्या समृद्धी योजनेस प्राधान्य दिले. हातावर काम करणाऱ्यांची अधिक संख्या असून, रोजगार मिळेलच, याची खात्री नसली तरी मुलीच्या शिक्षण आणि विवाहाची चिंता सर्वांनाच भेडसावते, असे अनेक पालकांनी बोलून दाखविले.

अशी आहेत वैशिट्य :

- सुरुवातीला कमीत कमी २५० रुपये ते दीड लाखापर्यंत रक्कम भरण्याची सोय आहे.
- खाते उघडल्यापासून २१ वर्षांनी बंद करता येते.
- मुलीच्या १८व्या वर्षी शिक्षणासाठी ५० टक्के रक्कम काढता येते.
- टपाल कार्यालयाने पासपोर्ट, आधार कार्ड, बँकिंग एटीएम सेवा सुरू केली आहे.

परतावा चांगला असल्याने प्रमाण वाढले
अनेकांनी पोस्टमनकडे विचारणा करून सुकन्या समृद्धी योजनेचे अर्ज मागून घेतले. लॉकडाऊनमध्ये हलाखीची स्थिती असतानाही सहा हजारांवर पालकांनी पाल्यासाठी प्राधान्य दिले आहे. या कल्याणकारी उपक्रमात नवनवे पालक सहभागी होत आहेत. त्यासाठी पोस्टमन तसेच पोस्टातील कर्मचारी मदत करतात. सहभागी कुटुंबांना गुंतवणुकीचा फायदा निश्चितच होणार आहे.
- पोस्टमास्टर आर. डी. कुलकर्णी (औरंगाबाद)

Web Title: 'Sukanya' of parents will give prosperity; Sukanya Samrudhi plan of Post office preferred during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.