उन्हाळ्यात आरोग्य विभागाने शिबिरे घ्यावीत
By Admin | Published: April 1, 2016 12:42 AM2016-04-01T00:42:37+5:302016-04-01T01:00:20+5:30
जालना : शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळिशी गाठत आहे. कडक उन्हामुळे जनजीवन काहीअंशी विस्कळीत होत आहे. कडक उन्हाळा पाहता
जालना : शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळिशी गाठत आहे. कडक उन्हामुळे जनजीवन काहीअंशी विस्कळीत होत आहे. कडक उन्हाळा पाहता नागरिकांनी आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे, जनजागृती करावी, असा सूर लोकमतने केलेल्या सर्व्हेक्षणातून निघाला. उन्हाळ्यात नागरिक आरोग्याबाबत जागरूक असतात का, या विषयावर प्रश्नावली माध्यमातून सर्व्हेक्षण करून नागरिकांचे मत जाणून घेण्यात आले.
उन्हाळ्यात आरोग्याबाबत नागरिक जागरूक असतात का? यावर ६० टक्के नागरिक आम्ही जागरूक असल्याचे सांगून उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेत असल्याचे सांगतात. २० टक्के नागरिक काळजी घेण्याची गरज नाही असे मत व्यक्त करतात. तर १० टक्के नागरिकांना याबाबत काहीच माहीत नाही. आरोग्य विभाग जनजागृतीसाठी कमी पडतो का? या विषयावर ५५ टक्के नागरिक आरोग्य विभागावर खापर फोडतात. ३० टक्के नागरिक आरोग्य विभागाची बाजू घेत जनजागृती केली जाते असे म्हणतात तर १५ टक्के नागरिक तटस्थ आहेत. उन्हाळमुळे आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी आरोग्य विभागाने शिबिरे घ्यावीत का? या प्रश्नावर ८० टक्के नागरिक होय असे उत्तर देतात. पाच टक्के नागरिकांना शिबीर घेण्याची गरज वाटत नाही तर १५ टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. (प्रतिनिधी)
शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत आहे. यामुळे अबालवृद्धांचे उन्हामुळे हाल होत आहेत. आरोग्य विभागाने उन्हापासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये अशी जागृती केल्यास नागरिकांना मार्गदर्शन मिळून आरोग्यावर होणारा परिणाम टाळतो.
४आरोग्य विभागाने उष्माघात रोखण्यासाठी काय करावे याचीही जागृती करण्याची मागणी बहुतांश नागरिकांनी केली. बहुसंख्य नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागावर बोट ठेवून शीतपेयांसोबतच बर्फाची तपासणी होत नसल्याचे सांगितले.
उन्हाळ्यातील शीतपेयांच्या दर्जाबाबत अन्न व प्रशासन विभाग सतर्क असतो का? या विषयावर १० टक्के नागरिकांना एफडीए सतर्क असते असे मानतात. ८० टक्के नागरिक एफडीए सतर्क नसल्याचे सांगतात. १० टक्के नागरिकांना या बाबत काहीच माहिती नाही.