उन्हाची तीव्रता वाढली; रस्ते ओस
By Admin | Published: March 26, 2017 10:58 PM2017-03-26T22:58:50+5:302017-03-26T23:00:54+5:30
बीड : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे.
बीड : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. उन्हापासून बचावासाठी गमजे, टोप्या, गॉगल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी बीड शहरातील मुख्य रस्ते ओस पडत आहेत.
वाढत्या उन्हामुळे थंड पेयांना मागणी वाढली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी रसवंत्या थाटण्यात आल्या आहेत. नागरिक सकाळी ११ पूर्वीच आपली कामे उरकून घर गाठत आहेत. सायंकाळी पाच नंतरही उकाडा कायम राहत आहे. अशा परिस्थितीत धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विद्युत पोल हटविले जात आहेत. परिणामी विद्युत पुरवठा खंडित होत आहे. याचा त्रास अबाल वृध्दांना सहन करावा लागत आहे.
वाढत्या उन्हामुळे फळांना देखील मागणी वाढली आहे. दुपारच्या वेळी बाजारपेठेतील गर्दी ओसरत असल्याचेही मागील दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)