(संडे स्टोरी) : चाळीस पोलिसांवर ९० हजार लोकसंख्येचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:06 AM2021-09-18T04:06:05+5:302021-09-18T04:06:05+5:30

सुरेश चव्हाण कन्नड : शहर पोलीस ठाण्यांतर्गत शहर आणि ग्रामीणमधील २३ गावे आहेत. म्हणजे सुमारे ८० ते ९० ...

(Sunday Story): Forty policemen burdened with a population of 90,000 | (संडे स्टोरी) : चाळीस पोलिसांवर ९० हजार लोकसंख्येचा भार

(संडे स्टोरी) : चाळीस पोलिसांवर ९० हजार लोकसंख्येचा भार

googlenewsNext

सुरेश चव्हाण

कन्नड : शहर पोलीस ठाण्यांतर्गत शहर आणि ग्रामीणमधील २३ गावे आहेत. म्हणजे सुमारे ८० ते ९० हजार लोकसंख्येच्या सुरक्षेची जबाबदारी शहर पोलिसांवर आहे. त्यासाठी शहर पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचारी मिळून ९५ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, सध्या ठाण्यात केवळ ४० पदेच भरण्यात आली आहेत.

शहर पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची मंजूर पदे भरलेली आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांपैकी सहायक फौजदाराची १४ पदे मंजूर असताना ६, पोहेकॉची २३ पदे मंजूर असताना केवळ ५, पोलीस नाईकची २३ पदे मंजूर असताना केवळ ७, पोकॉची २९ पदे मंजूर असताना १४ (७ महिला व ७ पुरुष) पदे कार्यरत आहेत. यापैकी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ५, तहसील, कोर्ट व सेशनकोर्ट कामासाठी प्रत्येकी एक कर्मचारी आहे. याशिवाय साप्ताहिक सुटीवर दररोज ५ जण जातात. म्हणजे दररोज १३ कर्मचारी पोलीस ठाण्याच्या कामी पडत नाहीत. याशिवाय कार्यालयीन कामकाजासाठी २ ते ३ कर्मचारीच आहेत. त्यामुळे दररोज केवळ १५ ते १६ कर्मचारी कामासाठी उपयोगी पडतात. अशा परिस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा किती ताण पडत असेल, याची कल्पना न केलेलीच बरी.

चौकट...

पदभरती नसल्याने सतत कामाचा ताण

कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेले खाते म्हणून पोलीस खाते ओळखले जाते. घडणाऱ्या घटना, गुन्हे याव्यतिरिक्त विविध पक्षसंघटनांचे मोर्चे, आंदोलने, सभा या सर्वांना बंदोबस्त पुरविण्याची जबाबदारी पोलिसांची. त्यामुळेच पोलीस ऑन ड्यूटी २४ तास असतात. अशात अपुरे मनुष्यबळ असले की, कामाचा ताण वाढल्याने पोलिसांची मानसिक स्थिती बिघडते. हक्काची साप्ताहिक सुटीही बऱ्याचदा उपभोगता येत नाही. कुटुंबासाठी, मुलांसाठी वेळ देता येत नाही, अशी अवस्था सध्या कन्नड शहर पोलिसांची झाली आहे. मात्र, शासन स्तरावरून या खात्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

Web Title: (Sunday Story): Forty policemen burdened with a population of 90,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.