MPSC Exam: दोन वेळा थोडक्यात हुलकावणी; तिसऱ्या प्रयत्नात राज्यात पहिला

By राम शिनगारे | Published: July 4, 2023 09:37 PM2023-07-04T21:37:02+5:302023-07-04T21:38:38+5:30

2020 साली झालेल्या MPSC PSI परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा सुनील खचकड राज्यात प्रथम

Sunil Khachkad of Chhatrapati Sambhajinagar is the first in the state in the MPSC PSI exam held in the year 2020 | MPSC Exam: दोन वेळा थोडक्यात हुलकावणी; तिसऱ्या प्रयत्नात राज्यात पहिला

MPSC Exam: दोन वेळा थोडक्यात हुलकावणी; तिसऱ्या प्रयत्नात राज्यात पहिला

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२० मध्ये घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर केला. या निकालात छत्रपती संभाजीनगरात पाच वर्षांपासून तयारी करीत असलेला वाशिम जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील तरुण सुनील भगवान खचकड याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या निकालानंतर सुनीलच्या मित्रांनी औरंगपुरा परिसरात एकच जल्लोष साजरा केला.

एमपीएससी आयोगाने पीएसआय पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर केला. यात ५८३ युवकांची निवड केली. सुनील खचकड हा पहिला आला. सुनीलने शहरातील औरंगपुरा भागात पाच वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या
सुनीलचे वडील शेतकरी आहेत. त्याने कला शाखेत पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतला होता.

२०१८, २०१९ साली झालेल्या पीएसआय पदाच्या परीक्षेत थोडक्यात यशाने हुलकावणी दिली. मात्र, त्याने तिसऱ्या प्रयत्नात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. निकाल जाहीर झाला तेव्हा सुनील गावी गेलेला असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत मित्रांनी जल्लोष साजरा केला. सुनील याला एक भाऊ असून तो सुद्धा स्पर्धा परीक्षेचीच तयारी करीत असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.

परीक्षेच्या ५४० पैकी ४२७ गुण

सुनील याने पीएसआय पदासाठीच्या परीक्षेत एकुण ५४० गुणांपैकी ४२७ गुण प्राप्त झाले आहेत. त्याला लेखी परीक्षेत ४०० पैकी ३१३ गुण, शारीरिक
चाचणी परीक्षेत १०० पैकी ८७ गुण आणि मुलाखतीत ४० पैकी २७ गुण मिळाले आहेत.

Web Title: Sunil Khachkad of Chhatrapati Sambhajinagar is the first in the state in the MPSC PSI exam held in the year 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.