‘एनआयपीएम’च्या अध्यक्षपदी सुनील सुतावणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:02 AM2021-08-29T04:02:12+5:302021-08-29T04:02:12+5:30
‘एनआयपीएम’ ही देशव्यापी संघटना आहे. स्थानिक शाखेची कार्यकारिणी निवडीसाठी शुक्रवार २७ ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्यात आली. सलग दुसऱ्यांदा ...
‘एनआयपीएम’ ही देशव्यापी संघटना आहे. स्थानिक शाखेची कार्यकारिणी निवडीसाठी शुक्रवार २७ ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्यात आली. सलग दुसऱ्यांदा सुनील सुतावणे अध्यक्षपदी निवडून आले आहेत.
उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष- अनुराग कल्याणी, अंजली भट, सचिव- पुनीत धिंग्रा, सहसचिव- आशिष वाघ, कोषाध्यक्ष- प्रमोद ताकवले. सदस्य- भारती अहिरे, नागेश देशपांडे, संजय बीडकर, सुचित्रा मेंडके व रवींद्र कोल्हारकर यांचा समावेश आहे. ही कार्यकारिणी २०२१ ते २०२३ या वर्षासाठी कार्यरत राहणार आहे.
निवडणूक अधिकारी म्हणून श्रीपाद पाटील यांनी काम पाहिले. पुढील दोन वर्षांत औरंगाबाद आणि जालना शहरामधील विविध प्रकारच्या आस्थापनेत काम करणाऱ्या मनुष्यबळ अधिकारी, शिक्षण क्षेत्र, उद्योजक आणि सरकारी यंत्रणेची एकजूट करून विविध क्षेत्रोपयोगी उपक्रमांची मोट बांधणे, हे नवीन कार्यकारिणीसमोरील एक मुख्य उद्दिष्ट आहे, असे म्हणाले.
कॅप्शन
सुनील सुतावणे