मंजुरी नसताना दिली कोट्यवधींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:56 AM2017-11-12T00:56:25+5:302017-11-12T00:56:28+5:30

महावितरणने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा जास्तीच्या रकमेची कामे कुठलीही निविदा प्रक्रिया पूर्ण न करता केवळ कोटेशनच्या आधारे दिल्याचा ठपका ठेवत महावितरणचे येथील तत्कालीन अधीक्षक अभयंता व सध्याचे हिंगोली येथील अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

superidentent engineer suspended | मंजुरी नसताना दिली कोट्यवधींची कामे

मंजुरी नसताना दिली कोट्यवधींची कामे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महावितरणने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा जास्तीच्या रकमेची कामे कुठलीही निविदा प्रक्रिया पूर्ण न करता केवळ कोटेशनच्या आधारे दिल्याचा ठपका ठेवत महावितरणचे येथील तत्कालीन अधीक्षक अभयंता व सध्याचे हिंगोली येथील अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव जालना येथे वर्ष २०१५ -१७ या काळात कार्यरत होते. वर्ष २०१५-१६ मध्ये केबल वायर बदलणे, एजीपंप दुुरुस्ती व देखभाल व दुरुस्तीची कामे यासह अन्य कामांसाठी महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडून दीड कोटींचा निधी मंजूर झाला होता. नियमानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून ही कामे करणे अपेक्षित असताना अधीक्षक अभियंता जाधव यांनी कोटेशन पद्धतीने एजन्सीधारकांना दोन कोटी १६ लाखांच्या कामांचे वाटप केले. तसेच २०१६-१७ मध्ये अशाच पद्धतीच्या कामासाठी एक कोटी ७८ लाखांचा निधी मंजूर असताना, खाजगी एजन्सीला चार कोटी १६ लाख रुपयांची कामे करण्याचे अधिकृत आदेश दिले. त्यानुसार संबंधित एजंन्सी धारकांनी ही कामे पूर्ण केली. मात्र, वाढीव रकमेने दिलेल्या कामांची देयके अनेक दिवस चकरा मारूनही निघत नसल्याने एजन्सीधारकांनी वरिष्ठ अधिका-यांकडे तक्रार केली. त्यानंतर निधी मंजूर नसतानाही जाधव यांनी अधिकच्या रकमेची कामे दिल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी चार ससदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती.

Web Title: superidentent engineer suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.