पोलीस अधीक्षक आरती सिंह यांचा पदकांचा डबल धमाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:13 AM2019-01-19T01:13:22+5:302019-01-19T01:14:27+5:30

औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या ३१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत विशेष ठसा उमटवताना शुक्रवारी पदकांचा डबल धमाका केला. सलग दुसऱ्या वर्षी वर्चस्व राखताना डॉ. आरती सिंह यांनी ५ कि. मी. चालण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्यांनी हे अंतर ३0 मिनिटांत पूर्ण केले. रौप्यपदक पोलीस उपायुक्त निर्मला देवी आणि कास्यपदक अप्पर पोलीस महासंचालक (एसआरपीएफ) अर्चना त्यागी यांनी पटकावले.

 Superintendent of Police Aarti Singh double explosion | पोलीस अधीक्षक आरती सिंह यांचा पदकांचा डबल धमाका

पोलीस अधीक्षक आरती सिंह यांचा पदकांचा डबल धमाका

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य पोलीस क्रीडा स्पर्धा : चालण्याच्या स्पर्धेत जिंकले सुवर्ण

औरंगाबाद : औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या ३१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत विशेष ठसा उमटवताना शुक्रवारी पदकांचा डबल धमाका केला. सलग दुसऱ्या वर्षी वर्चस्व राखताना डॉ. आरती सिंह यांनी ५ कि. मी. चालण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्यांनी हे अंतर ३0 मिनिटांत पूर्ण केले. रौप्यपदक पोलीस उपायुक्त निर्मला देवी आणि कास्यपदक अप्पर पोलीस महासंचालक (एसआरपीएफ) अर्चना त्यागी यांनी पटकावले. आदिती पडसलगीकर यांच्या हस्ते आरती सिंह यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
याच स्पर्धेत आरती सिंह यांनी नेमबाजीत जबरदस्त कामगिरी करताना २५ मीटर रॅपिड फायरमध्ये ५३ गुणांसह रौप्यपदक पटकावले. सुवर्णपदक कृष्णा प्रकाश आणि कास्यपदक दत्ता शिंदे यांनी पटकावले.
विशेष म्हणजे याआधी नवी मुंबई येथे गतवर्षी झालेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेतही आरती सिंह यांनी ५ कि. मी. चालण्याच्या स्पर्धेत गोल्डन कामगिरी केली होती.
पुरुषांच्या ५ कि. मी. चालण्याच्या स्पर्धेत औरंगाबाद येथील रेल्वे पोलीस दलाचे अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनीही ठसा उमटवताना रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत औरंगाबाद ग्रामीण पोलीसच्या खेळाडूंनीही जबरदस्त कामगिरी करताना तायक्वांदो खेळात तीन आणि बॉक्सिंग खेळात एक पदक जिंकले. तायक्वांदो खेळात भारती गावंडे यांनी रौप्य, तर सविता सोनवणे व तनुजा गोपालघरे यांनी कास्यपदकाची कमाई केली. आरती गावंडे यांनी बॉक्सिंग खेळात रौप्यपदकाची कमाई केली.

Web Title:  Superintendent of Police Aarti Singh double explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.