शिक्षकाविरुद्ध ग्रामस्थ अधीक्षकांकडे
By Admin | Published: August 28, 2016 12:03 AM2016-08-28T00:03:25+5:302016-08-28T00:19:18+5:30
बीड : विद्यार्थ्यास मारहाण करणारा शिक्षक दिलीप जोगदंड याच्यावर किरकोळ कलमान्वये गुन्हा नोंद झाला. त्याच्याविरुद्ध कलम ३०७ व डांबून ठेवल्याचे कलम लावून कारवाई करावी,
बीड : विद्यार्थ्यास मारहाण करणारा शिक्षक दिलीप जोगदंड याच्यावर किरकोळ कलमान्वये गुन्हा नोंद झाला. त्याच्याविरुद्ध कलम ३०७ व डांबून ठेवल्याचे कलम लावून कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी पाचेगावचे ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांना भेटले.
आदित्य गणेश राठोड (१३ रा. पाचेगाव ता. गेवराई) हा येथील आदर्श विद्यालयात सातवीच्या वर्गात शिक्षण घेतो. याच शाळेतील शिक्षक दिलीप जोगदंड हा एकनाथनगर भागात जिजाऊसाहेब वसतिगृह चालवतो. या वसितगृहात आदित्य राहतो. चार दिवसांपूर्वी त्याने वडापाव खाल्ला. ते कळाल्यावर शिक्षक जोगदंड याने त्याला चामड्याच्या बेल्टने मारहाण केली. त्यानंतर त्याला स्वच्छतागृहात डांबून ठेवले. यावेळी मारहाणीत त्याचे दोन दातही तुटले. जोगदंड बाहेरगावी गेल्यानंतर आदित्यने स्वत:ची सुटका करुन घेत आपल्या आईला घडला प्रकार सांगितला. त्यानंतर हे प्रकरण ‘लोकमत’ने लावून धरले. आदित्यचे आजोबा बाबूराव खेमा राठोड यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात शिक्षक जोगदंडविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र, किरकोळ कलमे लावली. कलमे वाढविण्यासाठी ग्रामस्थ पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना भेटले. यावेळी अरूण पवार, बिभीषण राठोड, विलास चव्हाण, कृष्णा राठोड, अंकुश राठोड, साहेबराव राठोड, संजय राठोड, शरद पवार, रावसाहेब पुना आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)