स्वीपरने घेतली चक्क चालकांची शाळा

By Admin | Published: January 18, 2017 07:21 PM2017-01-18T19:21:48+5:302017-01-18T19:21:48+5:30

आरटीओ कार्यालयामध्ये वाहन परवान्यांच्या नूतनीकरणासाठी आलेल्या वाहन चालकांना प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मोटार वाहन निरीक्षकांवर आहे. मात्र...

The Superintendent's School took Swipner | स्वीपरने घेतली चक्क चालकांची शाळा

स्वीपरने घेतली चक्क चालकांची शाळा

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 18 - आरटीओ कार्यालयामध्ये वाहन परवान्यांच्या नूतनीकरणासाठी आलेल्या वाहन चालकांना प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मोटार वाहन निरीक्षकांवर आहे . मात्र चक्क निरीक्षकांच्या स्वीपरने चालकांची शाळा भरवित त्यांना नियमांची माहिती करून दिली .
 
आरटीओने ट्रान्सपोर्ट लायसन्स धारकांचे लायसन्स नूतनीकरण करण्यापूर्वी वाहतूक नियमांसदर्भात त्यांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतो . यासाठी येथे प्रशिक्षण केंद्र आहे . नोव्हेंबर २०१ ५ पासून या प्रशिक्षण वर्गाला सुरुवात झाली. या प्रशिक्षण वर्गात मोटार वाहन निरिक्षक वाहतूक नियमांची माहिती देतात . वाहन चालविताना सीट बेल्ट लावा, मोबाइलवर बोलणे टाळा, आदी विविध बाबी त्यांना सांगण्यात येतात .
 
या प्रशिक्षणानंतरच लायसन्स नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. मात्र हा प्रशिक्षण वर्ग पूर्ण करण्यासाठी मोटार वाहन निरिक्षकांऐवजी खासगी कर्मचाऱ्यांची मदतही घ्यावी लागत असल्याचे दिसते . मोटार निरीक्षकांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका स्वीपरने प्रशिक्षण दिल्याची चर्चा बुधवारी सुरू होती . सदर स्वीपरकडे साधे लायसन्स नसल्याचेही सांगण्यात येत होते . त्यामुळे अशांकडून प्रबोधन वर्गाची गरज का?' असा सवाल उपस्थित होत आहे . या प्रकाराविषयी माहिती घेतली जाईल, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते म्हणाले .

Web Title: The Superintendent's School took Swipner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.