केंद्रीय पद्धतीने पुरवणी परीक्षांचे मूल्यमापन
By Admin | Published: July 20, 2016 12:09 AM2016-07-20T00:09:42+5:302016-07-20T00:31:30+5:30
औरंगाबाद : दहावी-बारावी परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै महिन्यातच घेतली जात आहे.
औरंगाबाद : दहावी-बारावी परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै महिन्यातच घेतली जात आहे. या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करता यावा म्हणून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय विभागीय मंडळाने घेतला आहे. विभागात प्रत्येकी तीन मूल्यांकन केंद्रे स्थापन करण्यात आली असून मंडळ अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. पूर्वी सप्टेंबर अखेरीस पुरवणी परीक्षेला सुरुवात होत असे; परंतु अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून गत वर्षापासून दहावी व यंदापासून बारावी परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै महिन्यात घेतली जात आहे. बारावीच्या (पान ५ वर)
फेब्रुवारी- मार्च महिन्यात झालेल्या बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्लेखन जालना जिल्ह्यातील एका वसतिगृहात केले जात असताना पोलिसांनी काही प्राध्यापकांना रंगेहाथ पकडले. तेथील उत्तरपत्रिकाही ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या उत्तरपत्रिकांचा निकाल जाहीर करण्यात आलेला नव्हता.
अलीकडे, जप्त केलेल्या उत्तरपत्रिका पोलिसांनी विभागीय मंडळाकडे सुपूर्द केल्या असून मंडळात सध्या संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे.
४चौकशी पूर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांचे निकालही जाहीर करण्यात आले असून उर्वरित ३२ विद्यार्थ्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांचे निकालही लगेच जाहीर केले जातील, असे प्रभारी सचिव वंदना वाहूळ यांनी सांगितले.