छत्र हरवलेल्यांना मायेची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:51 PM2017-08-14T23:51:47+5:302017-08-14T23:51:47+5:30

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गरजू, गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून गणवेश तसेच शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले

Support to orphans | छत्र हरवलेल्यांना मायेची ऊब

छत्र हरवलेल्यांना मायेची ऊब

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गरजू, गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून गणवेश तसेच शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. तर बीड येथील द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयात स्व. डॉ. रामविलास बाहेती यांच्या स्मरणार्थ मातृपितृ छाया योजनेंतर्गत माता-पालक व पिता-पालक यांचे छत्र हरवलेल्या ६५ गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात व्यासपीठावर सावित्रीबाई बाहेती, अ‍ॅड. विजयकुमार कासट, प्रमोद सारडा, संस्थेचे अध्यक्ष विष्णूदास तापडिया, मथुरादास कासट, रामेश्वर कासट, राजेंद्र मुनोत यांच्यासह प्राचार्य रामलाल छाजेड, पर्यवेक्षक राधाकिसन सारडा उपस्थित होते. यावेळी प्राचार्य छाजेड यांनी विद्यार्थ्यांच्या सुखदु:खात समरस होत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठीविद्यालयामार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येते. अनेक शिक्षणप्रेमी दातृत्व भावनाही जपत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी रामेश्वर कासट, विष्णूदास तापडिया, अ‍ॅड. विजयकुमार कासट यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन एस. एस. तोतला यांनी, तर एन. आर. मालपाणी यांनी आभार प्रदर्शन केले.
माहेश्वरी सभेतर्फे गणवेश वाटप
बीड येथील सहयोगनगरमधील राजस्थानी माध्यमिक विद्यालयात बीड तहसील माहेश्वरी सभेच्या वतीने ७० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी तसेच तहसील माहेश्वरी सभेचे संतोष चरखा, संतोष सोहणी, श्याम लाहोटी, शुभम धूत, जितेंद्र कासट, सूरज लोहिया, दिलीप मंत्री, प्रमोद मणियार, मुख्याध्यापिका काळे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन ए. जी. राऊत यांनी, तर ए. ए. ईगडे यांनी आभार मानले.
आहेरचिंचोलीत कार्यक्रम
बीड तालुक्यातील आहेर चिंचोली येथे नारायण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणप्रेमी नागरीकांच्या माध्यमातून गणवेश, वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य प्रकाश कवठेकर, अजिनाथ नागरगोजे, हरीहर बांगर, पालक सुदामराव काळे, रामेश्वर बहीर, राजाभाऊ सवासे, हनुमंत मदने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. ए. करपे यांनी, तर वाय. बी. चव्हाण यांनी आभार मानले.

Web Title: Support to orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.