वॉर्ड अधिकारीपदी सुरडकर, तारपे यांनी नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:04 AM2021-07-01T04:04:37+5:302021-07-01T04:04:37+5:30
आस्थापना दोन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्रीधर तारपे यांची झोन क्रमांक ६ चे वॉर्ड अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच ...
आस्थापना दोन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्रीधर तारपे यांची झोन क्रमांक ६ चे वॉर्ड अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच झोन क्रमांक ७ मधील वरिष्ठ लिपीक संजय सुरडकर यांची झोन क्रमांक १ चे वॉर्ड अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. झोन ६ च्या वॉर्ड अधिकारी मीरा चव्हाण यांनी मनपा प्रशासक यांच्याकडे विनंती केल्यामुळे त्यांच्याकडील वॉर्ड अधिकारीपदाचा पदभार काढून घेत त्यांच्याकडे महिला व बालकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त म्हणून पदभार देण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्याकडे झोन क्रमांक १ च्या वॉर्ड अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यांच्याकडील हा पदभार काढून घेत, नव्याने परिवहन व्यवस्थापक आणि पर्यटन विकास अधिकारी या दोन्ही पदांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला.