घाणेवाडी जलाशयाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:35 AM2017-08-19T00:35:34+5:302017-08-19T00:35:34+5:30
घाणेवाडीच्या संत गाडगेबाबा जलाशयाला शुक्रवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाणी आणि निसर्ग या विषयावर काम करणाºया संस्थांच्या एका शिष्टमंडळाने भेट दिली.
जालना : घाणेवाडीच्या संत गाडगेबाबा जलाशयाला शुक्रवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाणी आणि निसर्ग या विषयावर काम करणाºया संस्थांच्या एका शिष्टमंडळाने भेट दिली. या वेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी घाणेवाडी गाळमुक्त अभियान राबविणाºया घाणेवाडी जल संरक्षण मंचच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा केली.
यावेळी कॅटरपिलर या जगातील सर्वात मोठ्या गाळ उपसा करण्यासाठी अवजड यंत्राच्या निर्माण करणाºया कंपनीच्या प्रतिनिधी जॅनेट किरकटोन, नेचर या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाºया संस्थेचे आदित्य सूद, वॉटर पुणे या संस्थेचे दीपक झाडे, लोमेश जोरी, आदित्य शिंदे, घाणेवाडी जल संरक्षण मंचचे अध्यक्ष रमेशभाई पटेल, सुनील रायठ्ठठा, शिवरतन मुंदडा, प्रवीण भानुशाली, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे सुहास अजेगावकर आदी शेतकरी उपस्थित होते.
घाणेवाडी गाळमुक्ती अभियानात झालेल्या कामाचा अहवाल या संस्थेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर मांडण्यात येणार आहे.