‘त्या’ वंचित शेतकऱ्यांचे महावितरणकडून सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:05 AM2018-12-29T00:05:35+5:302018-12-29T00:06:02+5:30

लोकमत इफेक्ट : वरिष्ठांकडून दखल; सकाळीच अधिका-यांचे पथक दाखल

 The survey by the 'MSEDCL' of those deprived farmers | ‘त्या’ वंचित शेतकऱ्यांचे महावितरणकडून सर्वेक्षण

‘त्या’ वंचित शेतकऱ्यांचे महावितरणकडून सर्वेक्षण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
केºहाळा : सिल्लोड तालुक्यातील केºहाळा येथील हरण बर्डी शिवारात गेल्या ५० वर्षांपासून वीज पोहोचलीच नसल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर महावितरण कंपनीचे अधिकारी खडबडून जागे झाले. त्यांनी गावातील वंचित शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे.
केºहाळा येथील हरण बर्डी शिवारातील गट नं. १५५ मध्ये नाथाजी फकिरा सुरडकर यांची एकूण चार एकर शेती, तर गट नंबर १५७ मध्ये हुसेन शेख मोहंमद यांची सहा एकर व गट नंबर १५३ मध्ये सुखदेव रामराव बनकर यांची जमीन आहे. हे कुटुंब १९६८ पासून येथे वास्तव्यास आहेत. तब्बल पन्नास वर्षांचा कालखंड या कुटुंबाचा अंधारातच निघून गेला आहे. अनेक शिवारांतही ५० वर्षांपासून उजेड नाही. या शेतवस्तीवरील लोकांनी २०१० मध्ये कोटेशनही भरले आहे; पण महावितरणने दखल घेतलेली नाही. याप्रकरणी लोकमतने शुक्रवारच्या अंकात ‘आमचे सौभाग्य कधी उजळणार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून येथील शेतकºयांच्या समस्या उजेडात आणल्या होत्या. या वृत्ताची दखल घेत सकाळी ११ वाजताच महावितरणचे सिल्लोड येथील मुख्य कार्यकारी अभियंता अधिकार, उप कार्यकारी अभियंता सैवर, उप कार्यकारी अभियंता सुरसे, लाईनमन दत्ता गोराडे, राजेंद्र कुमावत आदींसह त्यांचे पथक हरण बर्डी शिवार गाठून त्यांनी वंचित शेतकºयांचे सर्वेक्षण केले. यावेळी अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, आमच्या पथकाने वीज नसलेल्या घरांचे सर्वेक्षण केले असून, याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. वरिष्ठांकडून आलेल्या सूचनांनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
४केºहाळा ग्रामस्थांना विजेच्या समस्या सहन कराव्या लागत आहेत. गेल्या महिन्यात तीन वेळा उच्च दाबाने गावात वीजपुरवठा झाल्याने अनेकांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. हरण बर्डी शिवारात महावितरणचे पथक आल्याचे कळताच उपसरपंच दत्ता कुडके व चेअरमन साहेबराव बांबर्डे यांनी रोष व्यक्त करीत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. चेअरमन साहेबराव बांबर्डे यांनी मुख्य कार्यकारी अभियंता अधिकार यांच्याकडे हट्ट धरला व पथकाला गावातील सर्व फिडरवर घेऊन जात तेथील समस्या निदर्शनास आणून दिल्या.

Web Title:  The survey by the 'MSEDCL' of those deprived farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.