पुन्हा गृहभेटी देऊन ज्येष्ठांचे होणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:05 AM2021-03-16T04:05:51+5:302021-03-16T04:05:51+5:30

सोयगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात कोविडचा प्रसार थांबविण्यासाठी पुन्हा ४५ ते ६० वर्ष वयोगटांतील विविध आजारांनी त्रस्त असलेल्या ज्येष्ठांचे ...

A survey of seniors will be conducted by giving home visits again | पुन्हा गृहभेटी देऊन ज्येष्ठांचे होणार सर्वेक्षण

पुन्हा गृहभेटी देऊन ज्येष्ठांचे होणार सर्वेक्षण

googlenewsNext

सोयगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात कोविडचा प्रसार थांबविण्यासाठी पुन्हा ४५ ते ६० वर्ष वयोगटांतील विविध आजारांनी त्रस्त असलेल्या ज्येष्ठांचे गृहभेटी देऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून शिक्षकांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणामध्ये ४५ ते ६० वर्ष वयोगटातील ज्येष्ठांचे गावनिहाय त्यांच्या गृहभेटी केल्या जाणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या गर्तेत सर्वेक्षण करण्याचा प्रयोग प्रशासनाने घेतला आहे. याबाबत तातडीचे आदेश तहसील कार्यालयाला प्राप्त झाले असून ज्या भागात २० पेक्षा अधिक संसर्गबाधित रुग्ण आढळून आले आहे. अशा ठिकाणी रुग्णांच्या संपर्कातील किमान २० जणांची चाचणी केली जाणार आहे. गावातील आशा स्वयंसेविका , अंगणवाडीसेविका व एक शिक्षक अशी पथके नियुक्त करण्यात आली आहे.

ही पथके मंगळवार दि.२३ पासून सर्वेक्षण सुरू करणार आहेत. त्यात ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव, लक्षणे असलेली तसेच सारीचा प्रादुर्भाव झालेल्या, अन्य गंभीर आजार असलेल्या लोकांची यादी तयारी केली जाईल. या सर्वेक्षणाची यादी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली जाईल. त्यानंतर तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने उपाययोजना केल्या जाणार आहेत.

Web Title: A survey of seniors will be conducted by giving home visits again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.