भूमापकाने हुशारी करत भावाकडे लाच देण्यास सांगितले; एसीबीने दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 03:52 PM2021-08-11T15:52:02+5:302021-08-11T15:57:41+5:30

Bribe Case in Aurangabad : जमिनीचा नकाशा तयार करून देण्यासाठी पैशाची मागणी केली होती

The surveyor cleverly says handover the bribe to his brother; The ACB arrested both of them | भूमापकाने हुशारी करत भावाकडे लाच देण्यास सांगितले; एसीबीने दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले

भूमापकाने हुशारी करत भावाकडे लाच देण्यास सांगितले; एसीबीने दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले

googlenewsNext
ठळक मुद्देआर्किटेक्टकडून भावामार्फत ९० हजार रुपये लाच घेताना भूमी-अभिलेखचा भूमापक पकडला

औरंगाबाद: कृषक जमिनीचे अकृषक जमिनीत रूपांतर करण्यासाठी आणि जमिनीचा नकाशा तयार करून देण्यासाठी आर्किटेक्टकडे १ लाख रुपये लाचेची ( Bribe Case )मागणी करून भावामार्फत ९० हजार रुपये लाच घेताना भूमी-अभिलेख विभागाच्या भूमापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ( Anti Corruption Bureau) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई सातारा परिसरात भूमापक अनिल विष्णू सावंत, त्याचा भाऊ सचिन विष्णू सावंत अशी आरोपींची नावे आहेत. (Land surveyor caught taking bribe of Rs 90,000 from architect through brother )

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार हे स्थापत्य अभियांत्रिकी सल्लागार आहेत. त्यांच्या पक्षकाराने कृषक जमिनीचे अकृषकमध्ये (एन. ए.) रूपांतर करण्यासाठी पैठण येथील भूमी-अभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयात प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावासोबत जमिनीचा रेखांकन नकाशा बरोबर आहे किंवा नाही, हे बघून डिमार्केशन नकाशा तयार करून देण्याचे काम आरोपी भूमापक अनिल सावंत यांच्याकडे होते. हे काम करण्यासाठी सावंत यांनी तक्रारदार यांच्याकडून ६० हजार रुपये लाच घेतली होती. यानंतरही त्यांनी आणखी एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अनिल सावंतची तक्रार केली होती. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, आरोपी सावंतने त्यांच्याकडून यापूर्वी ६० हजार रुपये घेतल्याचे मान्य केले आणि आणखी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ९० हजार रुपयांत काम करून देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार ९ ऑगस्ट रोजी सातारा परिसरात लाचेची रक्कम घेऊन बोलावले. 

भाई, दादांनी दोन वर्षांत केले पाच खून; अवैध धंदे, नशेखोरांमुळे पुंडलिकनगर परिसरात अशांतता 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला पकडण्यासाठी सातारा परिसरात सापळा रचला. यावेळी तक्रारदार हे लाचेची रक्कम घेऊन आरोपीकडे गेले असता, त्याने ही रक्कम त्याचा लहान भाऊ सचिनकडे देण्यास सांगितले. सचिनने तक्रारदार यांच्याकडून ९० हजार रुपये लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सचिनला लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. यानंतर अनिलला ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरा सातारा ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपअधीक्षक बी. व्ही. गावडे, रूपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोकरट, हवालदार सुनील पाटील, दिगंबर पाठक, विलास चव्हाण, चांगदेव बागुल यांनी ही कारवाई केली.

Web Title: The surveyor cleverly says handover the bribe to his brother; The ACB arrested both of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.