सर्वोपचार रुग्णालयाला शस्त्रधारी पोलिसांचे संरक्षण
By Admin | Published: March 26, 2017 11:23 PM2017-03-26T23:23:07+5:302017-03-26T23:25:55+5:30
लातूर : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या संरक्षणात वाढ करण्यात आली
लातूर : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. ‘सर्वोपचार’साठी आणखी चार शस्त्रधारी पोलीस व दोन विना शस्त्रधारी पोलीस रविवारपासून तैनात करण्यात आले आहेत.
शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर रुग्ण नातेवाईकांकडून झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यभर निवासी डॉक्टरांनी व आयएमएने आंदोलन केले होते. त्यामुळे राज्य सरकारने डॉक्टरांना संरक्षण पुरविण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी शहरातील सर्वोपचारला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलेंद्र चव्हाण, उपविभागीय पोलीस (अधिक वृत्त हॅलो/२ वर)