संशयितांची पोलिसांशी हुज्जत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:28 AM2017-09-03T00:28:28+5:302017-09-03T00:28:28+5:30
वीजचोरी प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या दोघांनी ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या येथील महावितरण पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांशी हुज्जत घालून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वीजचोरी प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या दोघांनी ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या येथील महावितरण पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांशी हुज्जत घालून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी मुकुंदवाडी (औरंगाबाद) येथे हा प्रकार घडला. येथील महाविरतण पोलीस ठाण्यात ५८ हजारांची वीज चोरी केल्याप्रकरणी मुकुंदवाडी परिसरातील गोपी भीमराव भवरे (२८) व दीपक सोपानराव ऊर्फ उंकडराव शिलोडे (४३) यांच्या विरुद्ध २०१६ मध्ये गुन्हा दाखल आहे.
संशयितांना पकडण्यासाठी गेल्यानंतर ते फरार होत असे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी महावितरण ठाण्याच्या अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी, साहाय्यक उपनिरीक्षक रावसाहेब पडाळे, हेड कॉन्स्टेबल तात्यासाहेब पांढरे यांनी मुकुंदवाडी येथे जाऊन वरील दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी पोलीस अधिकाºयांशी हुज्जत घातली. बदनापूर येथील एका आमदाराचे जवळचे नातेवाईक असल्याची ओळख सांगून राजकीय दबाव वापरण्याचा प्रयत्न केला, असे साहाय्यक निरीक्षक सूर्यवंशी यांनी सांगितले.
सदर आमदारानेही पोलीस अधिकाºयांना फोनवरून संपर्क करून दोघांना सोडून देण्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी दबावाला न जुमानता दोघांना ताब्यात घेऊन औरंगाबाद येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. औरंगाबाद परिक्षेत्रात ५० हजार ते एक लाखांपर्यंतच्या वीज चोरीची अनेक प्रकरणे दाखल असून, संबंधितांवर या पुढे अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.