निलंबित शिक्षण उपसंचालक अधिकारपदाच्या खुर्चीवर !
By Admin | Published: March 5, 2017 12:27 AM2017-03-05T00:27:43+5:302017-03-05T00:31:27+5:30
लातूर : नेहमी वादग्रस्त ठरलेले कैलास गोस्वामी यांचे विभागीय शिक्षण उपसंचालक पदावरुन चार दिवसांपूर्वी निलंबन करण्यात आले़
लातूर : नेहमी वादग्रस्त ठरलेले कैलास गोस्वामी यांचे विभागीय शिक्षण उपसंचालक पदावरुन चार दिवसांपूर्वी निलंबन करण्यात आले़ निलंबन कालावधीत त्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे़ परंतु, शनिवारी दुपारी गोस्वामी हे शिक्षण उपसंचालक पदाच्या खुर्चीवर बसल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत़
लातूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी असताना कैलास गोस्वामी यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती़ त्यानंतर हे लातूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर रुजू झाले़ दरम्यान, गोस्वामी यांच्या विरोधात पुण्याचे शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांच्याकडे तक्रार दाखल झाल्याने गोस्वामी यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई करीत १ मार्च रोजी निलंबित केले़
दरम्यान, गोस्वामी यांचा तात्पुरता अतिरिक्त पदभार सहायक संचालक एम़एम़ तेलंग यांच्याकडे सोपविण्यात आला़ गोस्वामी यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक केले़ परंतु, शनिवारी दुपारी ४़३० ते ५़२० वा़ च्या सुमारास गोस्वामी हे शिक्षण उपसंचालक पदाच्या खुर्चीवर बसल्याचे निदर्शनास आले़ विविध कामानिमित्ताने आलेल्यांशी ते चर्चा करीत होते़ हे पाहून अनेकजण अचंबित झाले़ दरम्यान, गोस्वामी म्हणाले, काही अधिकाऱ्यांनी कटकारस्थान रचून ही कारवाई माझ्यावर आणली आहे़ यातून काहीही निष्पन्न होणार नाही़