इसादच्या तलाठ्याचे निलंबन
By Admin | Published: September 19, 2014 11:59 PM2014-09-19T23:59:04+5:302014-09-20T00:07:03+5:30
परभणी : इसाद येथील तलाठी एम.पी. दादेवाड यांच्यावर जिल्हा प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.
परभणी : गारपिटीच्या नुकसानीत जास्तीचे क्षेत्र दाखवून मदत वाटप केल्याच्या कारणावरुन गंगाखेड तालुक्यातील इसाद येथील तलाठी एम.पी. दादेवाड यांच्यावर जिल्हा प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीत पिके बाधित शेतकऱ्यांच्या यादीत काही शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी असताना ते जास्तीचे दाखवून मदत केली.
तसेच सातबारावर केवळ खरीप पिकांचा पेरा लावलेला असताना रबी पिके, फळपिके, ऊस या पिकांचा पेरा न लावल्याने झालेल्या गारपिटीत कोणत्या पिकांचे नुकसान दाखवून अनुदान दिले, हे संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.
लेखाधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या पंचनाम्याच्या प्राप्त अहवालानुसार ही बाब गंभीर असल्याने जिल्हा प्रशासनाने तलाठी दादेवाड यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. (प्रतिनिधी)