मुख्य आरोपीस अटकेनंतर जामीन

By Admin | Published: February 17, 2016 10:51 PM2016-02-17T22:51:46+5:302016-02-17T23:00:32+5:30

हिंगोली : येथे फौजदारास मारहाण केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांस अटकपूर्व जामीन नव्हे, तर अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर जामीन मंजूर झाला आहे.

Suspension of main accused in custody | मुख्य आरोपीस अटकेनंतर जामीन

मुख्य आरोपीस अटकेनंतर जामीन

googlenewsNext

हिंगोली : येथे फौजदारास मारहाण केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांस अटकपूर्व जामीन नव्हे, तर अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर जामीन मंजूर झाला आहे.
फौजदार बालाजी तिप्पलवाड यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष बांगर यांस मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास पोलिसांनी पकडले. त्यानंतर न्यायाधीश पी.आर. शिंदे यांच्या न्यायालयासमोर हजर करून पाच दिवसांचा पीसीआर मागितला होता. मात्र तो नामंजूर केला. त्यानंतर आरोपीने जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयाने पाच हजारांच्या जातमुचकल्यावर तो मंजूर केला.
या प्रकरणातील इतर सात आरोपींना यापूर्वीच अटक झाली होती. त्यांना १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान दोन दिवसांची कोठडी देण्यात आली होती. यात आरोपींचा जबाब घेवून तपासिक अधिकारी फौजदार विवेक सोनवणे यांनी तीन मोटारसायकलीही जप्त केल्या होत्या.

Web Title: Suspension of main accused in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.