निहालभैय्या यांच्या अपात्रतेला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:57 PM2017-11-14T23:57:06+5:302017-11-14T23:57:11+5:30
पेन्शनपुरा प्रभागाचे नगरसेवक शे. निहाल शे.हाजी इस्माईल यांना बेकायदेशिर बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी नगरसेवक पदावर राहण्यास अपात्र घोषित केले होते. राज्यमंत्र्यांनी या आदेशास स्थगिती दिली आहे.
हिंगोली : पेन्शनपुरा प्रभागाचे नगरसेवक शे. निहाल शे.हाजी इस्माईल यांना बेकायदेशिर बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी नगरसेवक पदावर राहण्यास अपात्र घोषित केले होते. राज्यमंत्र्यांनी या आदेशास स्थगिती दिली आहे.
शेख निहाल यांच्याविरुद्ध मागच्या पंचवार्षिक काळात बेकायदेशीर बांधकामप्रकरणी बी.डी.बांगर व उमाशंकर जयस्वाल यांनी तक्रार दाखल केली होती. सर्व्हे क्रमांक ४७११ मध्ये पदाचा गैरवापर करून परवानगी न घेता बांधकाम केल्याची व जयस्वाल यांनी मालकी हक्क पुरावा नसल्याची तक्रार केली होती. यात दोषी ठरवून जिल्हाधिकाºयांनी शेख निहाल यांना क.४४ (१) ईनुसार नगरसेवकपदासाठी अपात्र ठरविले होते.
याविरोधात शेख निहाल यांनी नगरविकास खात्याचे राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे दाद मागितली होती. पाटील यांच्याकडे सुनावणी झाली. त्यांनी पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकाºयांच्या आदेशास स्थगिती दिली आहे. या प्रकरणात अॅड. वैभव उगले यांनी शेख निहाल यांची बाजू मांडली.
याबाबत प्रतिक्रिया देताना शेख निहाल म्हणाले, न्यायपालिकेवर माझा विश्वास आहे. माझे नगरसेवक पद पुन्हा कायम ठेवल्याने तो अधिक दृढ झाला आहे. त्यामुळे यापुढेही जनतेची कामे पूर्वीप्रमाणेच जोमाने करण्याची ग्वाही देतो, असेही ते म्हणाले.