स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:03 AM2021-09-05T04:03:32+5:302021-09-05T04:03:32+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, उच्च अधिकार समिती अध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे, माजी प्रदेशाध्यक्ष रविभाऊ तुपकर, प्रदेशाध्यक्ष ...

Swabhimani Teachers Association awards announced | स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे पुरस्कार जाहीर

स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे पुरस्कार जाहीर

googlenewsNext

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, उच्च अधिकार समिती अध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे, माजी प्रदेशाध्यक्ष रविभाऊ तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. संदीप जगताप, मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील, युवती आघाडी अध्यक्षा पूजा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शिक्षक संघटना कार्यरत आहे. मराठवाड्यातील शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, वृक्षारोपण, रक्तदान, साहित्य, कला, स्काऊट गाईड, स्वच्छ सुंदर शाळा, आदी क्षेत्रासह विद्यार्थिकेंद्रित उपक्रम राबविणाऱ्या शिक्षक, प्राध्यापकांची पुरस्कार निवड समितीने निवड केली आहे. ५ सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त हे पुरस्कार सुरू करण्यात आले असून, एका विशेष कार्यकमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

पुरस्कार प्राप्त शिक्षक पुढीलप्रमाणे, महेबूब अजिज अब्दुल पठाण (औरंगाबाद), प्रा. डॉ. यशवंत सोनुने (जालना), प्राचार्या डॉ. दीपा सावळे (उस्मानाबाद), प्रा. डॉ. द्वारका गिते-मुंडे (बीड) बालाजी तोरणेकर (नांदेड), देविदास गुंजकर (हिंगोली), विलास सिंदगीकर (लातूर), रामेश्वर जाधव (परभणी) यांची निवड पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते डॉ. शिवाजी हुसे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सतीश सोनटक्के, समन्वयक डॉ. बिभिषण बहिरट, मराठवाडा स्वाभिमानी शिक्षक संघटना महिला आघाडी अध्यक्षा ज्योती सोनवणे यांच्या समितीने केली आहे.

Web Title: Swabhimani Teachers Association awards announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.