स्वामी विवेकानंद विद्यालय, सेंट झेव्हियर्स उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:37 PM2017-12-16T23:37:32+5:302017-12-16T23:37:50+5:30
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या आंतरशालेय व्हेरॉक करंडक क्रिकेट स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यालयाने सेंट जोन्स संघाचा आणि सेंट झेव्हियर्स संघाने महाराष्ट्र पब्लिक स्कूलचा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या आंतरशालेय व्हेरॉक करंडक क्रिकेट स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यालयाने सेंट जोन्स संघाचा आणि सेंट झेव्हियर्स संघाने महाराष्ट्र पब्लिक स्कूलचा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली.
सकाळच्या सत्रात सेंट झेव्हियर्स स्कूलने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ७ बाद ११० धवा केल्या. त्यांच्याकडून आकाश विश्वकर्माने २४ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ४४ आणि कौस्तुभ गायकवाडने २१ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्र पब्लिक स्कूलकडून तनुज सोळुंके याने २० धावांत ३ गडी बाद केले. आदित्य पाटीलने २, विशाल कोटकर व कौशल कांबळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात महाराष्ट्र पब्लिक स्कूलचा संघ १३ षटकांत ७५ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून प्रथमेश देवने १८ व कौशल कांबळेने १५ धावा केल्या. सेंट झेव्हियर्सकडून विशाल बुरकुल व अथर्व जाधव यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. कौस्तुभ गायकवाड व रौनक झा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसºया सामन्यात स्वामी विवेकानंद अकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ८ बाद १०८ धावा केल्या. त्यांच्याकडून आनंद साळवेने ३७ चेंडूंत ३ चौकारांसह ४२ धावा केल्या. यश गाजरेने नाबाद २८ आणि ओंमकार शिंदेने १८ धावा केल्या. सेंट जोन्सकडून आकाश चौहानने २७ धावांत ३ व अजय पांचालने १८ धावांत २ गडीबाद केले. प्रत्युत्तरात सेंट जोन्सचा संघ १३.३ षटकांत ५७ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून देवश्री भावसारने ५ धावांत ५ गडी बाद केले. यश गाजरेने २ व रोहित बनसोडेने १ गडी बाद केला.