जिन रिफ्लेक्सोलॉजी दिनानिमित्त  राबविणार ‘स्वस्थ भारत अभियान’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 11:14 AM2023-06-01T11:14:35+5:302023-06-01T11:17:13+5:30

१ जूनपासून प्रारंभ : ४ राज्य, २१ दिवस, १८ शहरात, २१ सेमिनार 

Swastha Bharat Abhiyan will be implemented on the occasion of Gin Reflexology Day | जिन रिफ्लेक्सोलॉजी दिनानिमित्त  राबविणार ‘स्वस्थ भारत अभियान’

जिन रिफ्लेक्सोलॉजी दिनानिमित्त  राबविणार ‘स्वस्थ भारत अभियान’

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : इंटरनॅशनल रिफ्लेक्सोलॉजी जैन असोसिएशनतर्फे १ जून रोजी जिन रिफ्लेक्सोलॉजी दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त १ ते २१ जूनदरम्यान ‘स्वस्थ भारत अभियान’ राबविण्यात येणार आहे. 

जिन रिफ्लेक्सोलॉजी दिन ते आंतरराष्ट्रीय योग दिवस दरम्यान ‘स्वस्थ भारत अभियान’ असणार आहे. या अंतर्गत २१ दिवसांत, ४ राज्यांमध्ये, १८ शहरांत २१ सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भविष्यात होणाऱ्या गंभीर आजारांना जिन रिफ्लेक्सोलॉजीद्वारे कसे टाळायचे, याची सविस्तर माहिती या सर्व अभियानादरम्यान देण्यात येणार आहे. या अभियानाचा मीडिया पार्टनर ‘लोकमत’ आहे. 

या अभियानात आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी जिन असोसिएशनसोबत  महावीर इंटरनॅशनल, बालाघाट, अहमदनगर, जोधपूर, मॅजेस्टिक व मॅजिक  छत्रपती संभाजीनगर, ओसवाल जैन समाज अमरावती, भारतीय  जैन संघटना वरोरा, नवकार संगीत मंडळ, निफाड, श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन ट्रस्ट, पुणे, जय भगवान ॲक्युप्रेशर केंद्र मुंबई, श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन ट्रस्ट, पुणे, जय भगवान ॲक्युप्रेशर केंद्र मुंबई, सुकृत ट्रस्ट निसर्गोपचार व योग केंद्र मलाड, मुंबई यांच्यासह अन्य संस्था, संघटना अभियान यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते जिन रिफ्लेक्सोलॉजीचे संशोधनकर्ता जि.रि. अनिल जैन यांच्यासोबत जि.रा. शिल्पा जैन, जि.रि. अनुप्रीता गांधी, जि.रि.सपना गांधी, जि.रि. मोनिका काठेड, जि.रि. मयुरी सुराणा, जि.रि. अनिता सुराणा (मुंबई) असणार आहेत. 

अभियानाच्या नियोजनासाठी १० सदस्यांच्या समितीमध्ये राजेंद्र दर्डा, राजकुमार जैन, ललित गांधी, डाॅ. निर्मल पारधी, डॉ. सपना पाटणी (धुळे), नरेश ललवानी, संदीप काठेड, विमलेश गांधी, कल्पेश गांधी यांचा समावेश आहे. 

अभियानातील सेमिनार हे नि:शुल्क असून, सहभागी होण्यासाठी यू-टूब व फेसबुक बघण्यासाठी  या संकेतस्थळाचा वापर करावा, असे संयोजक अनिल जैन यांनी कळविले आहे. www.jinreflexology.in/jin

आज बालाघाटमधून अभियानाची सुरुवात 
स्वस्थ भारत अभियानाचा शुभारंभ गुरुवार, १ जून रोजी बालाघाट 
(मध्य प्रदेश) येथे होणार आहे. महावीर इंटरनॅशनलच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

२५ जूनला शहरात अभियानाचा सांगता सोहळा 
‘स्वस्थ भारत अभियाना’ची सांगता छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ जून रोजी होणार आहे. अध्यक्षस्थानी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा असणार आहे.

Web Title: Swastha Bharat Abhiyan will be implemented on the occasion of Gin Reflexology Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत