पंधरा दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल

By शांतीलाल गायकवाड | Updated: September 1, 2022 15:20 IST2022-09-01T15:16:53+5:302022-09-01T15:20:38+5:30

औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाची बैठक झाली.

Take a decisive stand on the reservation within fifteen days; Maratha Kranti Morcha's warning to the state government | पंधरा दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल

पंधरा दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल

औरंगाबाद: राज्य सरकारने येत्या पंधरा दिवसांत मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा. अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल, अशी भूमिका समाजाने घेतल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहिर केली.

औरंगाबादेतमराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाची बैठक झाली. यात झालेल्या निर्णयाची माहिती देताना पाटील म्हणाले,  आम्ही सरकारला दोन पर्याय देत आहोत. त्यातील पहिला पर्याय म्हणजे मराठा आरक्षणाविषयी नव्याने प्रक्रिया सुरू करणार का? ही भूमिका स्पष्ट करावी. दुसरा पर्याय सरकार सर्वोच्च न्यायालयात प्रकरणात रिव्ह्यू पिटीशन करणार का? तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात येत्या पंधरा दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा मराठा समाज निर्णायक आंदोलन करेल, असेही पाटील यावेळी म्हणाले. 

 

Web Title: Take a decisive stand on the reservation within fifteen days; Maratha Kranti Morcha's warning to the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.