दोषी डॉक्टरांवर कारवाई करा - मुंडे

By Admin | Published: April 25, 2016 11:07 PM2016-04-25T23:07:59+5:302016-04-25T23:38:25+5:30

बीड : डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्यामुळे पाच रुग्णांच्या दृष्टीला अद्यापही धोका आहे. अशा परिस्थितीत दोषी डॉक्टरांवर कारवाई न करता ‘संसर्ग होतच असतो’

Take action against guilty doctors - Munde | दोषी डॉक्टरांवर कारवाई करा - मुंडे

दोषी डॉक्टरांवर कारवाई करा - मुंडे

googlenewsNext



बीड : डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्यामुळे पाच रुग्णांच्या दृष्टीला अद्यापही धोका आहे. अशा परिस्थितीत दोषी डॉक्टरांवर कारवाई न करता ‘संसर्ग होतच असतो’ असे विधान राज्याच्या आरोग्यमंत्र्याने करणे म्हणजे दुर्दैवीच होय. दृष्टीला इजा झालेल्या रुग्णाला प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत सरकारने द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
जिल्हा रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियादरम्यान ससंर्ग झाल्याने रुग्णांची दृष्टी धोक्यात आली आहे. यात राज्य आरोग्य विभागाने पथक नेमून संसर्ग स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा अहवाल आरोग्य सचिवांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या अहवालावर शासन काय निर्णय घेते ते पाहणे गरजेचे आहे. सोमवारी दुपारी परळी येथे पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, रुग्णांच्या डोळ्यांना संसर्ग होऊ नये याची काळजी घेण्याचे काम डॉक्टरांचे आहे. अशा परिस्थितीतही दोषींना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत पाठिशी घालत आहेत, असा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)
रुग्णांच्या डोळ्यांना संसर्ग झाल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील ओ. टी. ला सील केले असून, अद्यापही कायम आहे. या प्रकरणात कारवाई झाल्यानंतरच सील निघणार आहे.

Web Title: Take action against guilty doctors - Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.