चढ्या भावाने खत-औषधी, बियाणे, विकणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:04 AM2021-05-29T04:04:16+5:302021-05-29T04:04:16+5:30
औरंगाबाद : खरिपाचा हंगाम सुरू होत असून, शेतकऱ्यांना बियाणे, खते मुबलक मिळावीत. खत आणि बियाण्यांची साठेबाजी करून चढ्या भावाने ...
औरंगाबाद : खरिपाचा हंगाम सुरू होत असून, शेतकऱ्यांना बियाणे, खते मुबलक मिळावीत. खत आणि बियाण्यांची साठेबाजी करून चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांनी दिले.
जि. प. स्थायी समितीची ऑनलाइन बैठक शुक्रवारी पार पडली. आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, सदस्य केशव तायडे, रमेश पवार, मधुकर वालतुरे, जितेंद्र जैस्वाल, पंकज ठोंबरे, किशोर पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष कवडे आदींसह अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती होती.
सीईओंनी पीएफएमएस प्रणालीनेच १५व्या वित्त आयोगाचे अनुदान खर्च करण्याच्या सूचना सर्व सरपंचांना दिल्या होत्या. मात्र, तातडीने करायच्या उपाययोजनांत त्याची आडकाठी येत असून, तातडीने खर्चाची सुविधा मिळावी, असा ठराव मधुकर वालतुरे यांनी मांडला. चढ्या भवाने खते-बियाणांची विक्री होऊ देऊ नका, कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात यावी, अशा मागणी जैस्वाल यांनी केली, तर युरियासह इतर खतांचे यावर्षीच्या योग्य नियोजनाबद्दल कृषी विभागाचे सदस्यांनी कौतुक केले.