भूजबळांसारखी कारवाई खैरेंवर व्हावी - आ. हर्षवर्धन जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:44 PM2017-07-31T14:44:34+5:302017-07-31T15:01:41+5:30
राष्ट्रवादीचे आ.छगन भूजबळ यांच्यावर ज्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. त्याच प्रमाणे शिवसेनेचे खा.चंद्रकांत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर भूजबळांसारखी कारवाई व्हावी. अशी मागणी शिवसेनेचे कन्नडचे आ.हर्षवर्धन जाधव यांनी केली.
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद: राष्ट्रवादीचे आ.छगन भूजबळ यांच्यावर ज्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. त्याच प्रमाणे शिवसेनेचे खा.चंद्रकांत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर भूजबळांसारखी कारवाई व्हावी. अशी मागणी शिवसेनेचे कन्नडचे आ.हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलतांना केली.
आ.भूजबळ यांना जसे तुरूंगात टाकले, त्याच धर्तीवर खैरेंना देखील मधे टाकण्यात यावे. त्यांनी लोकप्रतिनिधी निधीतून केलेल्या विकासकामांत केलेले घोळ ही एका प्रकारची चोरीच आहे. भूजबळांना एक न्याय आणि खैरे सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना दुसरा न्याय, हे योग्य वाटत नाही. खैरेंना क्लीन चीट सत्तेमुळे मिळत असेल तर भूजबळांना देखील तुरूंगातून बाहेर काढावे, अशी मागणी आ.जाधव यांनी केली.
खैरेंवर शासनानेच कारवाई केली पाहिजे. सर्व जिल्हाधिकाºयांना शासनाच्या कक्ष अधिकाºयांनी काढलेल्या परिपत्रकाचा हवाला देखील त्यांनी यावेळी दिला. उपविभागीय अधिकाºयांनी चौकशीअंती त्यांनी विकास निधीत केलेला घोटाळा समोर आला आहे. खैरेंवर काय कारवाई करणार, याबाबत एकदा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेईल. खैरेंऐवजी माझ्या नावाने पक्षविरोधी कारवाईचे बिल फाडण्यात येते की कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे आहे. पक्षाने देखील याप्रकरणी आत्मपरीक्षण केले पाहिजे.
निवडणुक आयोग, ईडीकडे तक्रार
खा.खैरेंनी विकासकामात घोळ केल्याचे चौकशी समितीच्या अहवाला उघड झाले आहे. खैरेंप्रमाणे सर्व लोकप्रतिनिधींच्या विकासनिधीतून केलेल्या कामाची चौकशी झाली पाहिजे. सुरूवात माझ्या मतदारसंघातून केली तरी चालेल. काम न करता मी पैसे उचलले असतील तर मी राजीनामा देतो. अन्यथा खैरेंनी तरी राजीनामा द्यावा. असे आव्हान देत आ.जाधव म्हणाले, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी निवडणुक आयोग, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात येईल.
मी छोटा उदयनराजे
मी माझ्या मतदारसंघातील छोटा उदयनराजेच आहे. शिवसेनेसह, काँग्रेस, भाजप हे माझ्यासमोर पर्याय आहेत. एकदा ठाकरेंशी भेटून बघणार. सर्व सेटल झाले तर ठिक नाहीतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून कुठे जायचे याचा निर्णय घेणार असल्याचे सांगून आ.जाधव यांनी भविष्यात पक्षबदलाचे थेट संकेतच दिले आहेत. अलीकडे जाधव यांची काँग्रेसशी जवळीक वाढल्याची चर्चा आहे. कन्नड मतदारसंघातून आजवर शिवेसना मोठ्या प्रमाणात मतांची साथ मिळालेली आहे. परंतु जाधव विरुध खैरे या राजकारणाने मतदारसंघात सेनेसमोर आव्हान निर्माण होत आहे.
असे वाटले जाते विकासनिधीचे काम
ज्या भागात, गावांत काम करायचे आहे. त्याचे नाव लोकप्रतिनिधीच्या लेटरहेडवर नमूद करून ते जिल्हा नियोजन विभागाकडे सादर करण्यात येते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यामार्फत त्या कामाचे अंदाजपत्रक तयार होते. बहुतांश ठिकाणी ठरविलेल्या गुत्तेदारामार्फतच ते काम व्हावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींचीच असते. कारण त्यामागे अर्थकारण आणि टक्केवारीचे मोठे गणित असते. मर्जीतील व्यक्तींकडूनच लोकप्रतिनिधीच्या स्थानिक विकासनिधीतील कामे होतात. लोकप्रतिनिधी चोºया करतात. व अभियंत्यांना शिक्षा भोगावी लागते. पुढाºयांना विकासनिधीच्या गैरवापरात शिक्षा झाल्याचे आजवर आढळून आलेले नाही. असे आ.जाधव म्हणाले.