पाण्यावर उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:35 PM2017-11-16T23:35:50+5:302017-11-16T23:35:59+5:30
छावणी भागातील शेकडो नागरिकांना ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो झाल्याचे समोर आले आहे. याविषयी ‘लोकमत’ने १५ नोव्हेंबरला सविस्तर वृत्त प्रकाशित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : छावणी भागातील शेकडो नागरिकांना ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो झाल्याचे समोर आले आहे. याविषयी ‘लोकमत’ने १५ नोव्हेंबरला सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेऊन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मनपा आयुक्तांना याप्रकरणी चौकशी करून त्वरित उपाययोजना करावी आणि याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. ‘लोकमत’मधील वृत्ताच्या कात्रणावर स्वाक्षरी करून डॉ. पाटील यांनी हे आदेश दिले आहेत.
छावणी परिषदेच्या जलवाहिन्यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करण्यात आला. महापौर बंगल्याच्या दक्षिणेपासून काही अंतरावर मनपाच्या १४०० आणि ७०० मि. मी. व्यासावरून छावणीसाठी दोन स्वतंत्र जोडण्यात देण्यात आल्या आहेत. ३०० आणि ३५० मि.मी. व्यासाच्या लाइनद्वारे पुढे छावणीत पाणी जाते. एक लाइन लष्करी भागात तर दुसरी लाइन नागरी वसाहतींसाठी आहे. एका नाल्यातून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीला कोणतीही उंची देण्यात आलेली नाही. दोन दिवस ही लाइन बंद होती. याचदरम्यान लिकेजमधून दूषित पाणी आत गेले असावे, असा अंदाज आहे. याविषयी ‘लोकमत’ने १५ नोव्हेंबरला सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेऊन डॉ. रणजित पाटील यांनी मनपा आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्ताच्या कात्रणावर स्वाक्षरी करून पाटील यांनी याप्रकरणी त्वरित आवश्यक उपाययोजना करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.