काळजी घ्या; कॅन्सर, कोरोनापेक्षाही सर्दी, खोकला अधिक तापदायक !

By संतोष हिरेमठ | Published: January 10, 2023 08:03 PM2023-01-10T20:03:59+5:302023-01-10T20:04:19+5:30

जिल्हा रुग्णालयातील स्थिती : अवघ्या नऊ महिन्यांत ओपीडीत लाखावर रुग्णांवर उपचार

Take care; Cold, cough more feverish than cancer, corona! | काळजी घ्या; कॅन्सर, कोरोनापेक्षाही सर्दी, खोकला अधिक तापदायक !

काळजी घ्या; कॅन्सर, कोरोनापेक्षाही सर्दी, खोकला अधिक तापदायक !

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक विभागात महिन्याकाठी हजारो रुग्णांवर उपचार होत आहेत. कॅन्सर, कोरोनापेक्षाही सर्दी, खोकल्याचे रुग्ण अधिक असल्याचे जिल्हा रुग्णालयातील आकडेवारीवरून पहायला मिळते. त्यातही मुलांना सर्दी, खोकल्याचा अधिक विळखा पडत असल्याचे दिसते.

घाटी रुग्णालयावरील रुग्णसेवेचा ताण कमी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय हा पर्याय ठरत आहे. प्रसूती विभाग, बालरोग विभाग, अस्थिव्यंगोपचार विभाग, सर्जरी विभाग, दंतोपचार अशा विविध विभागांची ओपीडी आणि आयपीडी सेवा आहे. सकाळी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू झाल्यापासून ते विभाग बंद होईपर्यंत प्रवेशद्वारात रुग्णांच्या रांगा असतात. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. पद्मजा सराफ यांच्या मार्गदर्शनाखालील रुग्णालयातील डाॅक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी रुग्णसेवा वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. एप्रिल ते डिसेंबर २०२२ या ९ महिन्यांच्या कालावधीत येथील विविध विभागांच्या ओपीडीत १ लाख ३८१६७ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

सर्वाधिक रुग्ण सर्दी, खोकल्याचे
बालरोग विभागात गेल्या नऊ महिन्यांत १७ हजार बालकांवर उपचार करण्यात आले. यामध्ये सर्दी, खोकल्यामुळे आलेल्या बालकांची संख्या ९८७१ आहे.

या आजारांचे रुग्ण वाढले
नेत्ररोग : ओपीडीत १४ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. डोळ्यासंबंधी अनेक त्रास घेऊन रुग्ण येत आहेत.
मधुमेह : मेडिसिन विभागाच्या ओपीडीत १३ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण अधिक आहेत.
दंतविकार : दंत विभागाच्या ओपीडीत १० हजारांवर रुग्णांवर उपचार करण्यात आले.

काय काळजी घ्याल?
सकस आहार, नियमित व्यायाम, व्यसनापासून दूर राहा. अनेकजण आजार, दुखणे अंगावर काढतात. त्यातून आजार वाढू शकतो. सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार जिल्हा रुग्णालयात घेता येतात. त्यामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

रुग्णसंख्येत वाढ
जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्याचा प्रयत्न आहे. एक्सरे, सिटी स्कॅन, ईसीजी यासह विविध तपासण्यांची सुविधाही आहे.
- डाॅ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्यचिकित्सक

कोणत्या विभागात किती जणांवर उपचार?
विभाग - रुग्णांवर उपचार
मेडिसिन-१३,३५९
स्त्री रोग -१२,७५१
अस्थिरोग-७,२०३
डोळ्यांचा विभाग-१४,५५१,
दंतविभाग-१०,१९३
बालरोग-१७,४६१
कान, नाक, घसा-६,८८४

Web Title: Take care; Cold, cough more feverish than cancer, corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.