‘अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावे’

By Admin | Published: December 25, 2016 11:54 PM2016-12-25T23:54:23+5:302016-12-25T23:56:01+5:30

जालना : शहरातील अनधिकृत अशा १७ धार्मिक स्थळांनी केलेले अतिक्रमण मंगळवारी पोलिस बंदोबस्तात काढण्यात येणार आहे.

'Take encroachment by yourself' | ‘अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावे’

‘अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावे’

googlenewsNext

जालना : शहरातील अनधिकृत अशा १७ धार्मिक स्थळांनी केलेले अतिक्रमण मंगळवारी पोलिस बंदोबस्तात काढण्यात येणार आहे. मात्र] कारवाई तसेच नुकसान व भावना जपण्यासाठी संबंधितांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे,असे आवाहन रविवारी झालेल्या बैठकीत पालिका व पोलिस प्रशासनाने केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अतिक्रमित असलेली १७ विविध धार्मिक स्थळे हटविण्याचे कडक सूचना आहेत. त्या दृष्टिने नगर पालिकेने नियोजन केले आहे. या संदर्भात रविवारी एसडीएम, तहसीलदार विपीन पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, चारही पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत धार्मिक स्थळांचा आढावा घेऊन चर्चा करण्यात आली. संबंधितांना अतिकमण काढून घ्यावे, अशा सूचना तसेच लेखी पत्रही देण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले. खांडेकर म्हणाले, जी धार्मिक स्थळांचे अतिक्रमण आहे. त्यांनी ते स्वत:हून काढून घ्यावेत अन्यथा पालिकेचे कर्मचारी काढून घेतील. मात्र, नागरिकांनी विधिवत ही धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढून घ्यावे. नगर पालिकेकडून काही मार्गदर्शन आवश्यक असल्यास ते करण्यात येईल. अतिक्रमण काढण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे खांडेकर यांनी स्पष्ट केले. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांनी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अतिक्रमित येणाऱ्या धार्मिक स्थळांचा आढावा घेऊन नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Take encroachment by yourself'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.