भटक्यांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी पुढाकार घेऊ
By Admin | Published: February 25, 2017 12:34 AM2017-02-25T00:34:31+5:302017-02-25T00:36:51+5:30
तामलवाडी :तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी भटके विमुक्त विकास परिषद व प्रतिष्ठानच्या वतीने भटक्यांचा स्रेहमेळावा पार पडला.
तामलवाडी : भटके समाजातील मुला-मुलींच्या अंगी असलेले कला-कौशल्य जोपासून त्याला वाव मिळणे आवश्यक आहे. या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून यमगरवाडी येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी भटके विमुक्त विकास परिषद व प्रतिष्ठानच्या वतीने भटक्यांचा स्रेहमेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी भटके विकास परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा रावळ तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर देशपांडे, नरसिंग झरे, महादेवराव गायकवाड, डॉ. अभय शहापूरकर, रावसाहेब कुलकर्णी, डॉ. संजय पुरी, चंद्रकांत गडेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अॅड. मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.
मेळाव्यास गजानन धरणे, विजय शिंगाडे, अण्णासाहेब चव्हाण, रामदास चव्हाण, डॉ. स्वाती बारसकर, स्मीता बारसकर, दयानंद राठोड, सतीश गंधे, राजेंद्र भट्ट, डॉ. जे. एस. कुलकर्णी, लता पुरी, भामाबाई देवकर, ललिता जाधव, डॉ. संपदा पाटील, तुकाराम पोलकर, स्वाती कुलकर्णी, सपोनि मिर्झा बेग, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब मगर, महादेव शेंडगे, अॅड. चित्राव गोरे, युवराज नळे, किशोर देशपांडे, रौप्यमहोत्सव कार्यकारी समितीचे विनोद पेंढारकर, रावसाहेब ढवळे, गजानन धरणे, शुभांगी तांबट, विजय वाघमारे, राजाभाऊ गजरे, नारायण बाबर, भारत विभुते आदी उपस्थित होते.
यमगरवाडी विद्यासंकुलाच्या माळावर आयोजित या स्रेहमेळाव्यात घिसाडी, पाथरवट, ओतारी, कैैकाडी, पारधी या समाजातील महिला, विद्यार्थी तसेच बचत गटाच्या महिलांनी स्वत: तयार केलेल्या विविध साहित्यांचे स्टॉल उभारले होते. यासोबतच २५ वर्ष भटके विकास परिषदेने भटक्यांसाठी काय काम केले, यातून यशाचा मार्ग कसा सापडला, याबाबतची माहिती देणारे पोस्टर प्रदर्शनही लावण्यात आले होते.