‘स्कू ल आॅफ प्लॅनिंग’ पुण्याला नेऊन दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:28 AM2017-12-27T00:28:21+5:302017-12-27T00:28:28+5:30

केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेली ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर’ (एसपीए) ही संस्था औरंगाबादऐवजी आता पुण्याला हलविण्याच्या हालचालींना वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना घेऊन त्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा आ. सतीश चव्हाण यांनी मंगळवारी केली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद करताना त्यांनी ही माहिती दिली.

 Take 'School of Life Planning' to Pune | ‘स्कू ल आॅफ प्लॅनिंग’ पुण्याला नेऊन दाखवा

‘स्कू ल आॅफ प्लॅनिंग’ पुण्याला नेऊन दाखवा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेली ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर’ (एसपीए) ही संस्था औरंगाबादऐवजी आता पुण्याला हलविण्याच्या हालचालींना वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना घेऊन त्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा आ. सतीश चव्हाण यांनी मंगळवारी केली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद करताना त्यांनी ही माहिती दिली.
मराठवाड्यामध्ये प्रस्तावित असलेल्या शैक्षणिक संस्था एक-एक करत दुस-या ठिकाणी वळविण्याचा सपाटा लावलेला असताना मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही ‘एसपीए’ पुण्याला होणार, अशी चर्चा होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आ. चव्हाण म्हणाले की, ‘औरंगाबादमध्ये होऊ घातलेली ‘एसपीए’ ही संस्था (पान २ वर)
काँग्रेस-राष्ट्रवादी
युतीची शक्यता!
गुजरात निवडणुकीमध्ये संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, मोदी यांच्या प्रभावाला प्रचंड धक्का बसला, असे चव्हाण म्हणाले. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप यांची युती ही अटळ असून, त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रस यांचीदेखील युती होईल, अशी शक्यता वाटते, असे सूतोवाच त्यांनी दिले. ‘शिवसेना आज कितीही म्हणाली तरी भाजपसोबत जाणारच. भाजपचा रथ रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते; परंतु अंतिम निर्णय तर पक्षश्रेष्ठींचाच असेल. काँग्रेसने जर एकटे लढण्याचा निर्णय घेतला तर २०१४ प्रमाणेच त्यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागेल, असे भाकीत चव्हाण यांनी वर्तविले.

Web Title:  Take 'School of Life Planning' to Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.