वीजबिलापोटी सोयाबीनच घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:56 PM2017-10-30T23:56:34+5:302017-10-30T23:56:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : खिशात पैसा नाही अन् सोयाबीन विकण्यास हमीभाव केंद्रही सुरू नाहीत. त्यापेक्षा महावितरणनेच या दराने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : खिशात पैसा नाही अन् सोयाबीन विकण्यास हमीभाव केंद्रही सुरू नाहीत. त्यापेक्षा महावितरणनेच या दराने सोयाबीन घेवून वीजबिल भरून घ्यावे, या मागणीसाठी शेतकºयांनी ३0 आॅक्टोबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास महावितरणसमोर ठिय्या दिला.
जिल्हाभरात सध्या महावितरणच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र सोमवारी पाहावयास मिळाले. अनेक ठिकाणी शेतकºयांनी आंदोलन करून महावितरणला टाळे ठोकले. हिंगोली तालुक्यातील ईसापूर रमना, सवड यासह विविध परिसरातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. सर्वांनीच महावितरण कार्यालयात सोयाबीन आणून टाकले. इसापूर रमना येथे खानापूर फिरडरवरून शेतामध्ये शेतीपंपासाठी लाईन जोडलेली आहे. परंतु गेल्या तीन दिवसांपासून येथील वीजपुरवठा थकबाकीमुळे बंद करण्यात आला. शिवाय शेतकºयांना याबाबत कुठलीही पूर्व सूचना महावितरणने दिली नसल्याचा आरोप शेतकरी करीत होते. वीजबिल भरण्यास शेतकरी तयार आहे. परंतु सोयाबीनला तीन हजार रूपये हमीभाव आहे. मात्र शासनाने सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यास सुरूवात केली नाही. बाजारात सोयाबीनला २२०० रूपये भाव मिळत असल्यामुळे शेतकºयांचे नूकसान होत आहे. वीजबिल भरण्यास शेतकरी तयार असून सोयाबीन हमीभावाने खरेदी करावी व महावितरणने बिल भरून घ्यावे, असा पावित्रा घेत शेतकºयांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आ.रामराव वडकुतेही आले होते. निवेदनावर विठ्ठल चौतमल, माधव कोरडे, ग्यानबा जगताप, शिवाजी जोजार, बाळू कावरखे, शिवाजी थोरात, रामराव जगताप, संतोष जगताप, ज्ञानेश्वर चौतमल, नामदेव चौतमल, सोनाजी जगताप, गोधाजी जगताप, तुळशिराम जगताप, प्रभाकर जगताप, शिवराम चौतमल, नारायण जगताप, ग्यानबा जगताप यांच्यासह शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत. शेतकºयांच्या मागण्यांकडे महावितरणच्या अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्यास ग्रामस्थ व राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने रास्तारोकोचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.