चर्चा तर होणारच.....जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:02 AM2021-08-26T04:02:17+5:302021-08-26T04:02:17+5:30
- कॉ. भीमराव बनसोड, लाल निशाण पक्ष व श्रमिकांचे नेते. ................. युवकांना बेरोजगार करण्याचे हे धोरण ९९ टक्के लोकांना ...
- कॉ. भीमराव बनसोड, लाल निशाण पक्ष व श्रमिकांचे नेते.
.................
युवकांना बेरोजगार करण्याचे हे धोरण
९९ टक्के लोकांना बेरोजगार करण्याचे हे धोरण आहे. मनूच्या धोरणानुसार हे सरकार वागत आहे. बेरोजगारीमुळे युवकांच्या चेहऱ्यावर आज तेज राहिलेले नाही. उच्चशिक्षित होऊनही त्यांना नोकऱ्या नाहीत. सरकारी मालमत्ता मूठभर लोकांच्या घशात घालण्यात येत आहे. मोदी, अंबानी, अडानी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुलामगिरीत हा देश जाईल. देशासमोर हे मोठे आर्थिक संकट राहील. खासगीकरणामुळे एकतर नोकऱ्या राहणार नाहीत. पं. जवाहरलाल नेहरू यांनी फार विचारपूर्वक खासगी मालमत्तांचे सरकारीकरण केले होते. आताचे सरकार नेहरुंच्या धोरणांविरुद्ध वागत आहे. खासगीकरणामुळे आरक्षणाचे तत्त्व निकालात निघाल्याशिवाय राहणार नाही. हा एक मोठा धोका आहे.
- अंबादास रगडे, बॅंकेचे निवृत्त व्यवस्थापक, औरंगाबाद