चर्चा तर होणारच...जोड..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:05 AM2021-09-09T04:05:02+5:302021-09-09T04:05:02+5:30
हिंदू - मुस्लिम यांचा डीएनए एकच असेल तर आज या देशात मुस्लिमांबरोबर काय व्यवहार सुरू आहे? डीएनए एकच आहे ...
हिंदू - मुस्लिम यांचा डीएनए एकच असेल तर आज या देशात मुस्लिमांबरोबर काय व्यवहार सुरू आहे? डीएनए एकच आहे असे म्हणणे...दिलको बहलानेके लिए गालिबे ख्याल अच्छा है, मुस्लिमांबरोबरचा व्यवहार बघा ना. भाजपचे अनेक नेते खुलेआम मुस्लिम विरोधी वक्तव्ये करीत आहेत. हे कशाचे द्योतक आहे?
.-मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी, संस्थापक, रिड ॲण्ड लिड फाऊंडेशन
........,...........
हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न....
हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे, हे सरसंघचालकांना आजच कसं जाणवलं? डीएनए एकच असताना काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याची गरज काय? अयोध्येतील बाबरी मशीद पाडून राममंदिर बांधण्याचा घाट कशासाठी?एनआरसी, सीएएचे प्रयोजन करण्याचे प्रय़ोजन काय? हा संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. यात आरएसएस नेहमीच आघाडीवर राहत आला. देशात २२ टक्के असलेल्या मुस्लिम समाजाला खूष करून त्यांची मते मिळवण्याचा हा प्रयत्न वाटतो.
-ॲड. रमेशभाई खंडागळे, ज्येष्ठ विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते
...........
सरसंघचालक कधीही सहज बोलत नाहीत....
हिंदू - मुस्लिम यांचे पूर्वज एकच हे सरसंघचालकांचे विधान बरोबर आहे. संघाकडे अनेक विद्वान आहेत. ते सतत चिंतन- मंथन करीत असतात. त्यातून निष्कर्षाप्रत आल्यावरच सरसंघचालक आपले मत व्यक्त करतात.ते सहज कधीही बोलत नाहीत. आपल्या देशातील मुस्लिम आणि हिंदू यांची चेहरेपट्टी सारखीच दिसते. शेख अब्दुल्ला यांनी आमचे पूर्वज हिंदू ह़ोते असे लिहून ठेवलंय, फारुक अब्दुल्ला हे शरद पवार यांचे मित्र आहेत. याबाबतीत शरद पवारांनी फारुक अब्दुल्ला यांना विचारावे.
- हरिभाऊ बागडे, माजी सभापती, महाराष्ट्र विधानसभा