चर्चा तर होणारच.... सोमय्यांना अटकाव चूक की बरोबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:04 AM2021-09-21T04:04:42+5:302021-09-21T04:04:42+5:30

....................................................................... किरीट सोमय्या ब्लॅकमेलर है ‘किरीट सोमय्या ब्लॅकमेलर है... सबको मालूम है’. भाजपचा सत्तेचा घास हिसकावून घेतल्यापासून जबरदस्त अस्वस्थता ...

Talk about rubbing salt in my wounds - d'oh! | चर्चा तर होणारच.... सोमय्यांना अटकाव चूक की बरोबर

चर्चा तर होणारच.... सोमय्यांना अटकाव चूक की बरोबर

googlenewsNext

.......................................................................

किरीट सोमय्या ब्लॅकमेलर है

‘किरीट सोमय्या ब्लॅकमेलर है... सबको मालूम है’. भाजपचा सत्तेचा घास हिसकावून घेतल्यापासून जबरदस्त अस्वस्थता वाढली आहे. कोल्हापुरात तर हसन मुश्रीफमुळे प्रदेशाध्यक्ष असूनही चंद्रकांत पाटील यांना राजकारणात पुरेसे स्थान नाही. त्यांना स्वत:लाच पुण्यात येऊन निवडणूक लढवावी लागते. हसन मुश्रीफ हे सर्वसामान्यांना व गरिबांना तसेच सर्व जातीधर्माला सोबत घेऊन चालणारे नेते आहेत. पहिल्यापासूनच त्यांची प्रतिमा स्वच्छ राहिली आहे. त्यांना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला बदनाम करण्याचा किरीट सोमय्या यांच्या आडून हा प्रयत्न होत आहे.

- मुश्ताक अहमद, सरचिटणीस, प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस

..............................................................................................

जनतेचे लक्ष हटविण्याचा हा प्रयत्न

किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून सध्या जनतेचे चांगले मनोरंजन सुरू आहे. किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे असेल, तर संबंधित एजन्सीकडे त्यांनी रितसर तक्रार करावी; परंतु तसे न करता ते त्यावर राजकारण करीत आहेत व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करीत आहेत. ते कधी पेट्रोल-डिझेलची भाववाढ, गॅसची दरवाढ, खाद्यतेलांच्या व डाळींच्या वाढलेल्या किमती, याविरुद्ध का बोलत नाहीत? कारण, त्यांना या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष हटवायचे आहे. म्हणून त्यांचे हे राजकारण आहे.

- किरण पाटील डोणगावकर, सरचिटणीस, औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस

Web Title: Talk about rubbing salt in my wounds - d'oh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.