टँकरचालक गल्लीबोळातही बेदरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 10:00 PM2019-06-08T22:00:36+5:302019-06-08T22:01:14+5:30

पाणीटंचाई वाढल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कमी वेळेत जास्त फेऱ्या मारण्याच्या प्रयत्नात गल्लीबोळात बेदरकार वाहने पळविली जात आहेत. चालकावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. परिणामी, किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात सतत होत आहेत.

The tanker rolls down the alleys | टँकरचालक गल्लीबोळातही बेदरकार

टँकरचालक गल्लीबोळातही बेदरकार

googlenewsNext
ठळक मुद्देधावता राक्षस : सातारा, मिसारवाडी, चिकलठाणा, गारखेडा, पडेगाव, हर्सूल, सिडको भागात सतत भीती


औरंगाबाद : पाणीटंचाई वाढल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कमी वेळेत जास्त फेऱ्या मारण्याच्या प्रयत्नात गल्लीबोळात बेदरकार वाहने पळविली जात आहेत. चालकावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. परिणामी, किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात सतत होत आहेत.
सातारा, चिकलठाणा, गारखेडा, पडेगाव, सिडको, हर्सूल, नक्षत्रवाडीसह परिसरात टँकरच्या फेºया सतत सुरू आहेत. ५ हजार तसेच २ हजार लिटरच्या पाणी टँकरची मोठी मागणी आहे. वेळेच्या आत पाण्याच्या खेपा टाकण्याचा टँकरचालकाचा प्रयत्न असतो, टँकर रिकामे केल्यानंतर ते पुन्हा भरण्यासाठी घाई करावी लागते. या प्रयत्नात दररोज किरकोळ अपघाताचे प्रकारही वाढले आहेत. गल्लीबोळात मोठ्या क्षमतेचे टँकर फिरू शकत नसल्याने २ हजार लिटरचे टँकर वाढले आहेत. मनपाकडे पाणी भरण्यासाठी येणाºया टँकरची रजिस्टरवर नोंद आहे; परंतु खाजगी टँकरचे पिकअप पॉइंट विविध ठिकाणी असल्याने त्याचा आकडा कुठेही दिसत नाही. प्रामुख्याने कोणतेही वाहन घेतल्यास त्याची नोंद आरटीओ कार्यालयात करावीच लागते, त्या वाहनाचा उपयोग काय आणि ते कोणत्या कामासाठी वापरले जाणार आहे. त्यानुसार रीतसर पासिंग केली जाते; परंतु पाचशेपेक्षा अधिक छोटे-मोठे टँकर शहर व परिसरात फिरत असून, त्यांच्याकडे आरटीओ कार्यालयाचा वाहतूक परवानाच असल्याचे समजते; परंतु ते कमर्शियल पाणीपुरवठा करणार आहे, अशी नोंद केल्याचे तुरळक सापडतात.

मनपाची नव्हे आरटीओची जबाबदारी
मनपाकडे पाणी भरणाºया टँकरपैकी किती वाहनांना रीतसर टँकरचा परवाना आहे, याविषयी खात्रीलायक उत्तर मनपाच्या अधिकाºयाकडे देखील मिळत नाही. भाडेतत्त्वावर ते पाणी भरून नेतात त्याविषयी नोंद घेतल्याचे जाणवत नाही. ती जबाबदारी आरटीओ कार्यालयाची असल्याचे सूत्राकडून समजते. मनपाकडे १०६ टँकर
पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाकडे रीतसर १०६ टँकरचीच नोंद असून, ते अधिकृत आहेत. ते दिवसभरात सहाशेपेक्षा अधिक फेºया मारतात; परंतु खाजगी मालकीच्या टँकरची संख्या १,२५० च्या आसपास गणली जाते. त्यांची अधिकृत कुठेही नोंद नाही. विविध सेंटरवर पाणी भरण्यासाठी येणाºया टँकरवर ‘मनपाचा पाणीपुरवठा’, असे लिहिलेले असते, ते पाणी बिनधास्त विकताना दिसत आहेत. पाणीटंचाईमुळे कमाईचे साधन म्हणून पाणी विकण्याचा सोपा धंदा अनेकांनी सुरू केला आहे. टँकरसाठी आरटीओ कार्यालयाकडून लागणारे नियम त्यांनी धाब्यावर बसविलेले आहेत. टँकरची रीतसर तपासणी करण्याचे संकेतही आरटीओकडून मिळाले असून, मनपाचे अधिकारीदेखील टँकर लॉबीच्या दबावामुळे ‘ब्र’शब्द बोलू शकत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: The tanker rolls down the alleys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.