अधिग्रहणाबरोबर टँकरही वाढले

By Admin | Published: January 1, 2015 12:16 AM2015-01-01T00:16:48+5:302015-01-01T00:26:12+5:30

लातूर : पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुकास्तरावर टंचाई कक्ष स्थापन करण्यात आले आहेत़ दहाही तालुक्यांच्या टंचाई निवारण कक्षात अधिग्रहणाचा ओघ वाढला आहे़

Tankers also increased with the acquisition | अधिग्रहणाबरोबर टँकरही वाढले

अधिग्रहणाबरोबर टँकरही वाढले

googlenewsNext



लातूर : पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुकास्तरावर टंचाई कक्ष स्थापन करण्यात आले आहेत़ दहाही तालुक्यांच्या टंचाई निवारण कक्षात अधिग्रहणाचा ओघ वाढला आहे़ ११७ गावे व २५ वाड्यांतून अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे़ टंचाई कक्षात १८५ प्रस्ताव सध्या दाखल आहेत़ ७७ प्रस्तांवाना मंजुरी देण्यात आली आहे़
जिल्हा परिषदेच्या वतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेत टंचाई कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़ जिल्हा परिषदेने १ डिसेंबरपासून तालुकानिहाय पंचायत समिती अंतर्गत टंचाई कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़ मागणीनुसार पाणीपुरवठा करण्याच्या सूचना संबंधित पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या वतीने समन्वय बैठकीत करण्यात आल्या आहेत़ या टंचाई कक्षाचा प्रमुख म्हणून गटविकास अधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे़ पाणीटंचाईच्या आलेल्या प्रस्तावाची माहिती तहसीलदार यांना तात्काळ देवून त्याची गरज लक्षात घेवून त्यावर दोन दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत़ या आदेशानुसार लातूर तालुक्यातील टंचाई कक्षाकडे ३० गावे, ४ वाड्यातून विहिरी, बोअरच्या अधिग्रहाणाची मागणी आली आहे़ पण प्रत्यक्षात २६ गावातून ४२ प्रस्तांवाची मागणी आली आहे़ यातील २१ गावातील ३५ प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहेत़ औसा तालुक्यातील २१ गावातून ४३ विहीर, बोअरचे अधिग्रहणाचे मागणी प्रस्ताव आले आहे़ यातील ६ गावचे ७ विहीर, बोअर अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ निलंगा तालुक्यातील १५ गावांमधून, १ वाडीमधून ४२ विहीर, बोअर अधिग्रहणाचे मागणी करण्यात आली आहे. ४ गावातील ८ प्रस्तांवाना मंजुरी देण्यात आली आहे़ निलंगा तालुक्यात २ गावातील ५ विहिर, बोअर अधिग्रहणाच्या मागणी प्रस्तावास मंजुरी आहे़ रेणापूर तालुक्यतील १५ गावामधून, १० वाड्यांमधून ४७ अधिग्रहणाची मागणी आहे.(प्रतिनिधी)
औसा तालुक्यातील मासुर्डी ,टाका येथे दोन टँकर तर अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव ,परचंडा दोन टॅकर ने पाणी पुरवाठा करण्यात येत आहे़ लातूर तालुकतील बाभळगाव, चिंचोली (ब़) चार टँकर सुरु आहेत़ रेणापूर तालुक्यातील कारेपूर-गोपाळवाडी, एक टँकर आणि जळकोट तालुक्यातील उमरदरा येथे एक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ अशा प्रकारे जिल्ह्यात ८ गावांतून १० टँकरणे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़

Web Title: Tankers also increased with the acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.