टँकरने पाणी देवून जगवली जाताहेत झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 06:16 PM2018-11-19T18:16:51+5:302018-11-19T18:17:19+5:30
वाळूज महानगर: जनसहयोग सेवाभावी संस्थेतर्फे स्वखर्चातून गोलवाडी फाट्याजवळील छावणी हद्दीतील तब्बल सहा हजार वृक्षाचे टँकने पाणी देवून संवर्धन करीत पर्यावरणाला हातभार लावला जात आहे.
वाळूज महानगर: जनसहयोग सेवाभावी संस्थेतर्फे स्वखर्चातून गोलवाडी फाट्याजवळील छावणी हद्दीतील तब्बल सहा हजार वृक्षाचे टँकने पाणी देवून संवर्धन करीत पर्यावरणाला हातभार लावला जात आहे.
पाच वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करुन नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी संस्थेतर्फे वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन केले जात आहे.
औरंगाबाद-नगगर महमार्गावरील गोलवाडी फाट्याजवळ छावणी हद्दीत ४ एकरमध्ये ४० विविध जातींची जवळपास ६ हजार झाडे लावली आहेत. परंतू पाण्याअभावी ही झाडे कोमेजून जात असल्याचे लक्षात येताच संस्थेने स्वखर्चातून पाणी देऊन झाडे जगविण्याचा निर्णय घेतला. मागील महिनाभरापासून दर रविवारी टँकरने पाणी देवून झाडांचे संगोपन केले जात आहे. तसेच संस्थेच्या सदस्यांकडून दररोज सकाळी दोन तास झाडांना आळे करणे, वाढलेले गवत काढणे आदी कामे केली जात आहेत. यांना छावणी परिषदेकडूनही मदत केली जात आहे.
आगामी काळात २५ हजार झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प संस्थेने केल्याचे अध्यक्ष प्रशांत गिरे यांनी सांगितले. झाडे जगविण्यासाठी संतोष कुंडेटकर, कासीम शेख, श्याम जेपल्ली, संदीप जगधने, संतोष वैरागड, कैलास खांड्रे, अनिस अंबाडे, संदीप गिरे, छावणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर, स्वच्छता अधिकारी संतोष बंसिले, अमजद अली, प्रदीप यादव, नंदकिशोर सोनार, आकाश निरंजन, जितेश सुरवाडे आदींसह छावणीचे नगरसेवक परिश्रम घेत आहेत.